एस.पी.बालसुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण; सुमित्रा महाजनांना पद्मभूषण तर सिंधुताई, प्रभुणेंना पद्मश्री

केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.
union government declares list of padma awardees
union government declares list of padma awardees

नवी दिल्ली : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे आणि गायक दिवंगत ए.पी.बालसुब्रह्मण्यम यांच्यासह सात जणांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. याचबरोबर लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि आसामचे माजी मुख्यमंत्री दिवंगत तरुण गोगोई यांना पद्मभूषण जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील समाजसेविका सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे. 

केंद्र सरकारने आज साज जणांना पद्मविभूषण जाहीर केला आहे. यात जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अॅबे, दिवंगत गायक एस.पी.बालसुब्रमण्यम, डॉ. बेल्ले मोनप्पा हेगडे, दिवंगत डॉ. नरिंदरसिंग कपानी, मौलाना वहिउद्दीन खान, पुरातत्वज्ञ बी.बी.लाल, वालूशिल्पकार सुदर्शन साहू यांचा समावेश आहे.

पद्मभूषण सन्मान दहा जणांना जाहीर झाला आहे. यात कला क्षेत्रात कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा, आसामचे दिवंगत माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, साहित्यिक चंद्रशेखर कंबार, लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन, माजी सनदी नृपेंद्र मिश्रा, लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक दिवंगत रामविलास पासवान,  दिवंगत राजकीय नेते केशुभाई पटेल, दिवंगत कलबे सादिक, उद्योगपती रजनीकांत देविदास श्रॉफ, त्रिलोचनसिंह यांचा समावेश आहे. 

पद्मश्री सन्मान  102 जणांना जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्रातील समाजसेविका सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे, साहित्यिक नामदेव कांबळे, कला क्षेत्रासाठी परशुराम गंगावणे, उद्योजिका जसवंतीबेन जमनादास पोपट यांचा समावेश आहे.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com