खासदार डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी मोदी अन् शहांना मुख्यमंत्र्यांनी केली विनंती

खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येस भाजप नेते कारणीभूतअसल्याचे सुसाईड नोटमधून समोर आले आहे.
uddhav thackeray says bjp leaders respoinsible for mp mohan delkar suicide should resign
uddhav thackeray says bjp leaders respoinsible for mp mohan delkar suicide should resign

मुंबई : केवळ आरोप झाल्याने नैतिकतेतून मंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, मुंबईत खासदार मोहन डेलकरांनी आत्महत्या केली असून, त्यावर भाजप गप्प का? या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दादरा-नगर हवेलीतील प्रशासनाने मुंबई पोलिसांना चौकशीत सहकार्य करावे यासाठी निर्देश द्यावेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज म्हणाले. 

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला. या वेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते. 

यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. त्यांनी खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, गेल्याच आठवड्यात आणखी एक आत्महत्या मुंबईत झाली आहे. तिच्याबद्दल कोणीच बोलत नाही. पूजा चव्हाण प्रकरणात सुसाईट नोट नाही, कोणी आरोप केलेले  नाही तरी राठोडांनी राजीनामा दिला आहे. पण डेलकरांची तर 13-14 पानांची सुसाईड नोट आहे. यात भाजपच्या काही उच्च पदस्थांची नावे आहेत. त्यांनाही आता राजीनामा द्यायला लावायला हवा.

या भाजपचे नेत्यांनी डेलकरांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यामागे त्यांच्या वरिष्ठांचा हात आहे का, हेसुद्धा पाहायला हवे. एका खासदाराने आत्महत्या केली. तब्बल सातवेळा एकाच मतदारसंघातून निवडून आलेला खासदार आत्महत्या करतो. इकडे आल्यानंतर दुर्दैवाने  ते म्हणताहेत की, इथले मुख्यमंत्री आणि पवारसाहेबांवर माझा विश्वास असून ते मला न्याय देतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये असलेली नावे भाजप अथवा भाजपशी निगडित पदाधिकाऱ्यांची असतील तर त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा परवाना देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांनी दिला आहे? का याचे उत्तर मिळायला हवे. डेलकरांनी आत्महत्या केल्यावर त्यांचे घर उघडे पडले. त्यांच्या पत्नी निराधार झाल्या. त्यांची बाजू कोण का मांडत नाही? त्यांच्यासाठी रस्त्यावर का कोण उतरत नाही?  डेलकरांच्या सुसाईड नोटमध्ये नावे आलेल्यांची पोलीस चौकशी करणार आहेत. परंतु तो केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी तेथील प्रशासनाला निर्देश द्यावेत की मुंबई पोलीस तपासासाठी आल्यानंतर त्यांना सहकार्य करा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com