उदयनराजे म्हणाले, "..तर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार.." - Udayan Raje said Then I will resign | Politics Marathi News - Sarkarnama

उदयनराजे म्हणाले, "..तर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार.."

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा देईल, असं वक्तव्य भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केलं.

मुंबई : वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी मी राजीनामा देईल, असं वक्तव्य भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केलं. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी हे व्यक्तव्य केलं आहे. मी कधीही राजकारण केलं नाही. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं ठोस निर्णय घेतला पाहिजे. अन्य समाजाबाबत माझ्या मनात आदर आहे. कोणत्याही समाजावर अन्याय होता कामा नये. प्रत्येक जणांना न्याय मिळाला पाहिजे, अस माझं मत आहे. न्यायालयाने सगळ्याना समान अधिकार दिले आहेत, त्यांच्यावर अन्याय झाला तर उद्रेक होईल, असं उदयनराजे यांनी सांगितलं. 

जनतेनं तुम्हाला निवडून दिलं असतं, त्यांच जाणीव लोकप्रतिनिधींनी ठेवली पाहिजे. समाजातील प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. अन्याय होणार असेल तर लोकशाहीतील राजांनी राजासारखं वागलं पाहिजे. तुम्हाला जमत नसेल तर राजेशाही आणा, मी दाखवतो, काय करायचं, काय नाही करायचं हे मी सांगतो, असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं. जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहुन काय करणार, असा प्रश्न उदयनराजे यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काही केलं नाही तर मी वेळ आली तर राजीनामा देईन, असं उदयनराजे म्हणाले. 

छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्यदैवत आहे. त्यांच्या वंशजांबद्दल आपल्या सगळ्याच्या मनात अपार श्रद्धा आहे. यांच्यात कोणी फूट पाडू नये. मराठा आरक्षणाबाबत कोणी नेतृत्व करावं, यासाठी छत्रपतींच्या घरात दोन भाग पडतील, अशी परिस्थिती निर्माण करू नये, दोघांनीही त्याचं नेतृत्व करणं गरजेचं आहे. वाद होणार नाही, तसा प्रयत्न करू नये, दोन्हीही समजूतदार आहेत. दोघांनीही नेतृत्व करावं, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.  

मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या खंडपीठासमोर आहे. यामुळे राज्य सरकारने पोलिस भरती करू नये, पोलिस भरती थांबविली नाही, तर मराठा समाजाचा आक्रोश रस्त्यावर दिसेल, असा इशारा खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण सध्या न्यायप्रविष्ठ असताना, राज्य सरकार पोलिस भरती का करीत आहे, असा प्रश्न संभाजी राजे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी टि्वट केलं आहे. ते म्हणतात की सरकारनं मराठा समाजाला चिथावणी दिली आहे. सरकारचं टाइमिंग चुकलं आहे. मराठा आरक्षणाशिवाय ही पोलिस भरती करू नये. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे, असं टि्वट संभाजी राजेंनी केलं आहे. 
 
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहे. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याबाबत राज्य सरकारवर टीका केली असून समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते, अशी भूमिका मांडली आहे. या स्थगितीवर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मात्र उदयनराजेंचे मत आले नव्हते. त्यांनी ते आज सविस्तरपणे मांडले आहे. याबाबत ते म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला मोठी खिळ बसली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख