भाजप नेत्यांनंतर आता प्रशांत भूषण यांनाही ट्विटरचा दे धक्का!

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांना दणका देणाऱ्या ट्विटरने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनाही धक्का दिला आहे.
twitter flags prashant bhushan tweet and block his account for 12 hours
twitter flags prashant bhushan tweet and block his account for 12 hours

नवी दिल्ली : केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर (Twitter) असा वाद सध्या सुरू आहे. केंद्र सरकारने ट्विटरविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेत्यांना दणका देणाऱ्या ट्विटरने ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांनाही धक्का दिला आहे. भूषण यांचे ट्विट दिशाभूल करणारे असल्याचे म्हणत ट्विटरने त्यांचे अकाउंटही 12 तासांसाठी ब्लॉक केले होते. यावर भूषण यांनी दुसरे ट्विट करुन उत्तर दिले आहे. 

भूषण यांनी वृत्तपत्रातील एक बातमी ट्विट केली होता. कोरोनाची लस घेतल्यानंतर एका महिलेचा 10 दिवसांत मृत्यू झाला, अशी ही बातमी होती. त्यासोबत भूषण यांनी म्हटले होते की, चाचण्या न झालेल्या लशींचा प्रायोगिक तत्वावर वापर करूल वैश्विक लसीकरण मोहीम विशेषत: तरुण आणि कोरोनातून बरे झालेल्यांसाठी राबवणे हे बेजबाबदारपणाचे आहे. 

यावर ट्विटरने भूषण यांचे ट्विट दिशाभूल करणारे असल्याची सूचना लावली. त्यानंतर भूषण यांनी दुसरे ट्विट करीत उत्तर दिले. त्यांनी म्हटले की, निरोगी तरुण हे कोरोना संसर्गामुळे गंभीर आजारी पडण्याची अथवा त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यांची लशीमुळेचे मृत्यू होण्याची शक्यता अधिक आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढलेली असते. त्यामुळे त्यांनी लस घेण्याची आवश्यकता नसते. लस घेतल्यास त्यांच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीवरही परिणाम होऊ शकतो.  

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. आता केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com