अखेर ठरलं...ममतादीदी पारंपरिक भवानीपूरमधूनच लढणार; सोवनदेव चटर्जींचा राजीनामा

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता मिळवण्याची हॅटट्रिक केली असली तरी नंदिग्राममध्ये त्यांचा पराभव झाला होता.
TMC leader Sovandeb Chatterjee resigns as MLA from Bhawanipore
TMC leader Sovandeb Chatterjee resigns as MLA from Bhawanipore

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सत्ता मिळवण्याची हॅटट्रिक केली असली तरी नंदिग्राममध्ये (Nandigram) त्यांचा पराभव झाला होता. नंदिग्राममध्ये अतिशय अटीतटीच्या लढतीत भाजपचे सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) जायंट किलर ठरले होते. नंदिग्राममधून लढण्यासाठी ममतांनी त्यांचा पारंपरिक भवानीपूर श्(Bhawanipore) मतदारसंघ सोडला होता. आता त्या तेथूनच निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

ममतांच्या तालमीत तयार झालेले आणि त्यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी सुवेंदू अधिकारी  अधिकारींनी अतिशय प्रतिष्ठेच्या नंदिग्राममधील लढतीत ममतांना पराभवाचा धक्का दिला होता. ममतांनी त्यांचा पारंपरिक भवानीपूर मतदारसंघ सोडून अधिकारींचा बालेकिल्ला असलेल्या नंदिग्राममध्येच त्यांना आव्हान दिले होते. राज्यात भाजपचा पराभव झाला असला तरी नंदिग्रामच्या विजयाने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. 

आता भवानीपूर मतदारंसघातून निवडून आलेले तृणमूलचे आमदार सोवनदेव चटर्जी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष विमान बॅनर्जी यांनी स्वीकारला आहे. यामुळे ममतांचा भवानीपूरमधून निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

याबद्दल बोलताना विमान बॅनर्जी म्हणाले की, मी सोवनदेव चटर्जी यांना त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे का, याबद्दल विचारणा केली. त्यांनी स्वेच्छेने कोणत्याही दबावाशिवाय राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. यामुळे माझे समाधान झाले असून, मी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. 

नंदिग्रामवर अधिकारी कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. कधीकाळी तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत अशी त्यांची ओळख होती पण सुवेंदू यांनी बंडाचा झेंडा रोवत भाजपशी हातमिळवणी केली . त्यानंतर येथील राजकीय समीकरणे बदलली. आता नंदिग्राम हा मतदारसंघ भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा ठरला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापनेचे भाजप स्वप्न भंगले आहे. राज्यातील एकूण 292 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 213 मतदारसंघात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला आहे. या वेळी 77 जागांसह भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. राज्यात बहुमताचा आकडा पार करुन मोठ्या बहुमतासह पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी सत्ता स्थापन केली आहे. बंगालमध्ये भाजपचा हिंदुत्ववाद विरुद्ध ममतांची बंगाली अस्मिता अशी लढाई होती. अखेर ममतांची बंगाली अस्मिता भाजपवर भारी पडली आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com