भय इथले संपत नाही...नवीन 3 लाख रुग्ण अन् तब्बल 2 हजार 23 मृत्यू - three lakhs covid positive patients found in india in last 24 hours | Politics Marathi News - Sarkarnama

भय इथले संपत नाही...नवीन 3 लाख रुग्ण अन् तब्बल 2 हजार 23 मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 21 एप्रिल 2021

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. मागील 24 तासांत सुमारे 3 लाख नवीन रुग्ण सापडले आहेत. 

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत सुमारे 3 लाख नवीन रुग्ण सापडले असून, 2 हजार 23 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 56 लाख 16 हजार 130 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 82 हजार 553 झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत कोरोनाचे नवीन 2 लाख 95 हजार रुग्ण सापडले. यामुळे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाखांवर गेली आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या सलग 42 व्या दिवशी वाजढली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 21 लाख 57 हजार 538 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 13.82 टक्के आहे. याचवेळी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 85.01 टक्क्यावर आले आहे. 

देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 32 लाख 76 हजार 39 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.17 टक्के आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 7 ऑगस्ट 20 लाख, 23 ऑगस्ट 20 लाख, 5 सप्टेंबर 40 लाख, 16 सप्टेंबर 50 लाख अशी वाढत गेली. त्यानंतर 28 सप्टेंबर 60 लाखस 11 ऑक्टोबर 70 लाख, 29 ऑक्टोबर 80 लाख, 20 नोव्हेंबर 90 लाख आणि 19 डिसेंबर 1 कोटी अशी वाढत गेली. देशातील कोरोना रुग्णसंख्या 19 एप्रिलला दीड कोटींवर गेली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख