तीन पिढ्यांचं कुटुंब एका क्षणातच ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं!

काही भागात भूस्खलन झाले असून अनेक नद्यांना महापूर आला आहे.
तीन पिढ्यांचं कुटुंब एका क्षणातच ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं!
Heavy Rainfall in kerala

तिरुअनंतपुरम : केरळमध्ये (Kerala) मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. काही भागात भूस्खलन (LandSlide) झाले असून अनेक नद्यांना महापूर आला आहे. कोट्ययाम जिल्ह्यात कावली गावाजवळ शनिवारी दरड कोसळून अनेकांची घरं मातीच्या ढिगाऱयाखाली गाडली गेली. त्यातीलच एका घरात 65 वर्षांच्या आजी, आई-वडिलांसह त्यांच्या तीन मुलीही होत्या. तीन पिढ्यांचं अस्तित्व असलेल्या या कुटुंबातील कुणीच वाचलं नाही.

क्लारम्मा जोसेफ (65), त्यांचा मुलगा मार्टिन (48), सून सिनी आणि तीन नाती सोना (11), स्नेहा (13) व सॅन्ड्रा (9) अशी या सहा जणांची नावं आहेत. हे सहाही जण घटना घडली त्यावेळी घरातच होते. आजींसह त्यांची सून व एका नातीचा मृतदेह हाती लागला आहे. मार्टिन यांच्या कुटूंबासह याठिकाणी आणखी चार जण भूस्खलनात गाडले गेले आहेत. मार्टिन यांच्या घराशेजारी आणखी तीन घरे होती.

Heavy Rainfall in kerala
सिध्दू लागले कामाला; थेट सोनियांना पत्र लिहित करून दिली आश्वासनांची आठवण

दरम्यान, केरळमध्ये पावसाने आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांचे संसार वाहून गेले असून घरांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील 24 तासांतही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री पी. विजयन यांनी केंद्र सरकारकडे लष्कराला पाचारण करण्याची मागणी केली आहे. कोट्टायम आणि इडुक्की या जिल्ह्यांत भूस्खलनाची घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे धरणांमधील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले जात आहे.

Heavy Rainfall in kerala
त्या एवढ्या मोठ्या नाही, या पवारांच्या वक्तव्यावर पंकजांचा पलटवार

कोट्यायममध्ये 12 तर इडुक्कीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती आहे. मुसळधार पावसाने अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. घरं, शेती तसेच वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rains) अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पाच जिल्ह्यांत रेड अलर्ट (Red Alert) जाहीर केला आहे. पथानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या जिल्ह्यांत येत्या काही दिवसांत अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. याशिवाय सात जिल्हयात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. राज्य सरकारने मदतीची विनंती केल्यानंतर लष्कर आणि हवाई दलासह एनडीआरएफचे बचाव कार्य सुरू आहे.

केरळच्या अनेक जिल्हयात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते जलमय असून अनेक जण बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे. पथानमथिट्टा, कोट्टायम, एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूर या पाच जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू असून, अनेक ठिकाणी वाहने पाण्याखाली गेली आहेत.

हवामान विभागाने केरळच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर अरबी समुद्रात कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झाल्याले म्हटले आहे. यामुळे राज्यात विविध ठिकाणी १७ ऑक्टोबरपर्यंत अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर १८ ऑक्टोबरला अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच १९ ऑक्टोबरला सकाळी पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.