प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहणासाठी जात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात; 3 ठार 60 जखमी - three congress workers died in accident in moga district in punjab-sj84 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहणासाठी जात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बसला भीषण अपघात; 3 ठार 60 जखमी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जुलै 2021

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार आज स्वीकारत आहेत. याचवेळी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.   

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh Sidhu) हे आज स्वीकारत आहेत. या कार्यक्रमासाठी जात असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बसला आज भीषण अपघात झाला. या अपघातात तीन काँग्रेस कार्यकर्ते ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहे. यामुळे पंजाब काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. 

सिद्घू हे प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार असून, हा कार्यक्रम चंडीगडमध्ये होणार आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस कार्यकर्ते बसने जात होते. त्यावेळी मोगा जिल्ह्यात या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 3 काँग्रेस कार्यकर्ते ठार झाले तर 60 हून अधिक जण जखमी झाले. या अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. या अपघाताविषयी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी ट्विट केले आहे. 

अपघातातील जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मोगाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकर्ते प्रदेशाध्यक्षांच्या पदग्रहण कार्यक्रमासाठी झिरा येथून खासगी बसने चंडीगडकडे जात होते. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुसऱ्या बसला धडकली. यात तिघे ठार झाले तर 60 जण जखमी झाले. यातील 24 जण गंभीर जखमी आहेत. जखमींनी नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

सिद्घू हे आज प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. याचबरोबर चार कार्याध्यक्षही पदभार स्वीकारतील. या कार्यक्रमाचे निमंत्रण सिद्धू यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, माझी नियुक्ती ही सोनिया गांधी यांनी केली आहे. माझी तुमच्या विरोधात भूमिका नाही. लोकांच्या बाजूची माझी भूमिका आहे. तुम्ही पंजाब काँग्रेसमधील ज्येष्ठ आहात. त्यामुळे तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला येऊन काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीली आशीर्वाद द्यावेत. 

हेही वाचा : एका चहामुळे संपला मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांमधील चार महिन्यांचा दुरावा 

सिद्धू वगळता मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नवीन चार कार्यकारी अध्यक्षांची काल (ता.22) भेट घेतली होती. सिद्घू यांनी पदभार घेण्याआधी सर्व आमदार, खासदार आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी चहाला बोलावले होते. मुख्यमंत्री अमरिंदरसिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात मागील 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून वाद सुरू आहे. भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सिद्धू यांनी काँग्रेसच्या विजयानंतर पंजाबमध्ये उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशी शक्यता होती. परंतु, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी याला विरोध केल्याने सिद्धू यांना दुसरे मंत्रालय देण्यात आले होते. तेव्हापासून दोघांचा वाद सुरू असून, आता सिद्धू यांनी उघड बंड पुकारले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख