Karnataka Assembly Elections Result 2023 Live : काँग्रेसच्या ऐतिहासिक विजयांमध्ये 'ही' रणनिती ठरली महत्त्वाची; भाजपच्या आत्याधुनिक यंत्रणेला पहिल्यांदाच दिला छेद

Karnataka Assembly Elections Result : भारत जोडो यात्रेपासून बदलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात अत्याधुनिक यंत्रणा राबवण्यातही आघाडी घेतली होती.
Rahul Gandhi News
Rahul Gandhi NewsSarkarnama

प्राची कुलकर्णी

Karnataka Assembly Elections Result News : कर्नाटच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस ऐतिहासिक विजय साजरा करत आहे. भारत जोडो यात्रेपासून बदलेल्या काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात अत्याधुनिक यंत्रणा राबवण्यातही आघाडी घेतली होती. काँग्रेसची पारंपारिक लढत विरुद्ध भाजपची (BJP) अत्याधुनिक यंत्रणा याला पहिल्यांदाच काँग्रेसने कर्नाटकात छेद दिला.

तब्बल नऊ महिन्यांपासून एक केंद्रीय निवडणूक वॉररुम स्थापत करुन यंत्रणा राबवली गेली ती या विजयासाठी महत्वाची ठरली. तसेच या यंत्रणेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने संपर्क ठेवला गेला. कर्नाटकात पहिल्यांदाच बदललेली काँग्रेस पहायला मिळाली, आणि यासाठी कारणीभूत ठरली ती काँग्रेसने राबवलेली आधुनिक यंत्रणा. कर्नाटक निवडणूक जाहीर होणाच्या अनेक महिने आधीच या सगळ्याची तयारी सुरु झाली होती.

माजी आयएएस अधिकारी शशिकांत सेंथिल यांना कर्नाटक निवडणुकीसाठी संपुर्ण अत्याधुनिक यंत्रणा राबवण्याची जबाबदारी देण्यात आली. आणि इथून सुरुवात झाली ती बदललेल्या काँग्रेसची (Congress). या यंत्रणेत पहिल्यांदा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना सहभागी करुन घेण्यात आले. ही तज्ज्ञ मंडळी अशी होती ज्यांना थेट राजकारणात किंवा कुठल्याही पक्षाशी स्व:तला जोडून घ्यायचे नव्हते. मात्र, विचारसरणीच्या दृष्टीने मदत करायची होती.

Rahul Gandhi News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

त्यांच्या सहभागानंतर पहिले काम केले गेले ते म्हणजे विविध मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद. ग्राउंड यंत्रणा असणाऱ्या काँग्रेसमध्ये नेत्यांच्या पलिकडे जाणे तसे सहसा होत नाही. पण इथे मात्र नेत्यांच्या ऐवजी कार्यकर्त्यांशी संपर्क वाढवण्यात आला. याचा साहजिक फायदा झाला तो कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी. ही ग्राऊंड लेव्हलची मशीनरी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरली गेली आणि साहजिकच त्याचा फायदाही पक्षाला झाला.

एरवी काँग्रेस म्हणले की नेत्यांमधली भांडणे, हेवेदावे, गटबाजी हे ओघाने येतेच. मात्र, यावेळी काँग्रेसने जाणीवपुर्वक सर्व नेतृत्व एक असल्याचा संदेश दिला. वरची फळी म्हणजे कर्नाटकसाठी जबाबदार असणारे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि ज्येष्ट नेते सिद्धरामय्या यांना तर एकत्र आणले गेलेच पण यांच्या बरोबरीने कुठेही स्थानिक पातळीवर काही भांडणे, वाद असतील तर त्यात लक्ष घालून संवाद साधून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला गेला.

दुसरे महत्वाचे धोरण ठरवण्यात आले ते म्हणजे भाजपने ऐरणीवर आणलेल्या कोणत्याही मुद्दांना थेट प्रत्युतर न देणे. या संपुर्ण प्रक्रियेत सहभागी असणारा एक नेता म्हणाला ''भाजपने टीपू सुलतान पासून ते बजरंग बली पर्यंत अनेक मुद्दे प्रचारता आणले. मात्र, त्याला बळी पडायचे नाही हे धोरण पहिल्यापासून प्रत्येक पावलावर ठसवले जात होते. दोनच मुद्दे भ्रष्टाचार आणि विकास हे काँग्रेसच्या अजेंडावर होते.

Rahul Gandhi News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकात काँग्रेसचा ऐतिहासिक विजय; बीएस येडियुरप्पा म्हणतात...

शेवटपर्यंत त्याच मुद्दांवर राहण्यात पक्ष यशस्वी ठरला. अर्थात यात महत्वाची भुमिका बजावली ती कार्यकर्त्यांबरोबरच्या संवादानेच. कोण काय प्रतिक्रिया देतेय यापासून ते कोण कसे काम करते या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवली जात होती. त्यावर वेळोवेळी उपाय केले जात होते. उदाहरणार्थ कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्याने भ्रष्टाचारावर पत्र लिहिले आणि मग काँग्रेसने आपला प्रचार त्याच मुद्द्याभोवती भिरवला. 'पे टु सिएम' ही मोहीम यशस्वी झाली.''

याच्या बरोबरीनेच प्रत्येक स्थानिक भागासाठी महत्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर काँग्रेसने काम केले. राज्याचे पाच भाग करुन त्या प्रत्येक भागासाठी माँनिटरींग साठी एक टीम नेमली गेली. आणि त्यातून 24 तास 224 उमेदवारांशी आणि इलेक्शन एजंट्सशी संपर्क ठेवला गेला. इव्हीएम बाबत ट्रेनींग देण्यापासून सुरु झालेला हा प्रवास अगदी मुद्दांवरुन न हटण्यापर्यंत झाला. दर पाच वर्षांनी सरकार बदलणाऱ्या कर्नाटकात यंदा काँग्रेसला लोकांनी आशिर्वाद दिला तो त्यांचे आजपर्यंतचे सर्वाधिक मताधिक्य देऊन.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com