‘हे’ अपयश निवडणूक प्रमुख आमदार मेघेंचे की चंद्रशेखर बावनकुळेंचे ?

चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून आले. त्यांची जादू चालेल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पण जादू चालली नाही.
‘हे’ अपयश निवडणूक प्रमुख आमदार मेघेंचे की चंद्रशेखर बावनकुळेंचे ?
Sameer Meghe and Chandrashekhar Bawankule. Sarkarmana

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द ठरवल्यानंतर जिल्ह्यातील १६ जिल्हा परिषद सदस्य अपात्र ठरले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल काल लागला. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाले. या निवडणुकीचे प्रमुख म्हणून हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली होती आणि माजी ऊर्जामंत्री आणि प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे नेहमीप्रमाणे आघाडीवर होते. आता आलेले अपयश मेघेंचे की बावनकुळेंचे, यावर राजकीय वर्तुळात ठोकताळे लावणे सुरू आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतल्याचे दिसून आले. त्यांची जादू चालेल, अशी अपेक्षा सर्वांनाच होती. पण जादू चालली नाही, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, यासाठीही पक्ष जबाबदार असल्याची बाब अधोरेखित झाली. सध्या बावनकुळे साधे आमदारही नाहीत. याचाच प्रचार विरोधकांनी जास्त केला. ते स्वतः आमदार नाहीत, त्यांच्याच पक्षाने त्यांना नाकारले आहे, यापुढेसुद्धा त्यांना निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता नाही, या आणि अशा अनेक गोष्टींचा प्रचार विरोधकांनी धडाक्याने केला. त्यामुळे भाजपने या पोटनिवडणुकीत प्रचंड मेहनत घेऊनही त्यांच्या पदरी अपयश आले.

https://www.sarkarnama.in/mumbai/deposits-of-ten-congress-candidates-were-seized-in-palghar-vd83

निवडणूक प्रमुख आमदार समीर मेघे होते. त्यामुळे या अपयशाचे खापर त्यांच्या एकट्यावर फोडणे न्यायिक होणार नाही. बावनकुळेंनी प्रचंड मेहनत (नेहमीप्रमाणे) घेतली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीसपद त्यांच्याकडे आहे. त्या पदाला ते न्यायसुद्धा देत आहे. पण गेल्या विधानसभेत भाजपने त्यांना उमेदवारी नाकारल्याचाच मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आणि त्यात त्यांना यश आले. ही निवडणूक कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच झाली. म्हणजे आमदार मेघे जरी निवडणूक प्रमुख होते, तरी केदार विरुद्ध बावनकुळे असा हा सामना रंगला होता. बावनकुळेंनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली, ही बाब विरोधकांनीही मान्य केली विरोधक असलेल्या कॉंग्रेसच्या एका बड्या नेत्याने ही बाब खासगीत बोलूनही दाखवली, हे बावनकुळेंचे यश आहे. मग भलेही पक्षाला अपयश आले असेल.

Sameer Meghe and Chandrashekhar Bawankule.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, नाना पटोले पहिल्यांदा खरं बोलले…

मित्रप्रेमापोटी गमावले चिन्ह, अन् झाला पराभव...

जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल निधान हे यावेळी त्यांच्या गुमथळा सर्कलमधून अपक्ष लढले. वास्तविकतः त्यांनी सुरुवातीला मित्र योगेश डाफ यांच्यासाठी तिकीट मागितले होते. पक्षाने ते दिलेही, पण निधान यांनीच लढावे, असा आग्रहसुद्धा धरला. पक्षाने निधान आणि डाफ या दोघांना एबी फॉर्म दिल्याची माहिती आहे. ऐनवेळी डाफ यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि निधान कायम राहिले. पण त्यांनी पक्षाचा एबी फॉर्म का नाही जोडला, हे मात्र कळू शकले नाही. कमळाशिवाय निवडणूक लढल्यामुळेच त्यांचा पराभव झाला, असे त्यांच्या सर्कलमधील लोक सांगत आहेत.

Related Stories

No stories found.