Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Sharad Pawar
Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Sharad PawarSarkarnama

आबेंडकरांसाठी ठाकरे पवारांना सोडतील का? वंचित-शिवसेना आघाडीची चर्चा

आंबेडकरांचा राष्ट्रवादीला विरोध आहे. त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकरांना एकत्र यायचे असले तरी राष्ट्रवादीचे काय करणार असा प्रश्नच आहे.

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray News : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेना (Shivsena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावरुन आता शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र, या युतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कुठे असेल, असा प्रश्न विचारला जात आहे.

रविवारच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, आमच्या मध्यंतरी अनेक बैठका झाल्या आहेत. आमचे वैचारीक व्यासपीठ एकच असल्याने आम्हाला एका व्यासपीठावर एकत्र येण्यासाठी अडचण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसची अडचण नाही. परंतु राष्ट्रवादी सोबत जाण्यास त्यांचा विरोध आहे, हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Sharad Pawar
Uddhav Thackeray News : दोघांना एकत्र येण्यास अडचण नाही; ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस, शिवसेना या पक्षांचा समावेश आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, त्यांचा राष्ट्रवादीला विरोध होता. त्यामुळे तेव्हा ती आघाडी फिसकटल्याची चर्चा होती. यामध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसकडे अधिक जागांची मागणी केली होती, त्यामुळेही आघाडी झाली नसल्याचे सांगण्यात येते.

आंबेडकरांचा राष्ट्रवादीला विरोध आहे. त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकरांना एकत्र यायचे असले तरी राष्ट्रवादीचे काय करणार असा प्रश्नच आहे. आंबेडकर आपली भूमिका सोडतील अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे महाआघाडी होणार की नाही, हे पहावे लागणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना सोडून ठाकरे आणि आंबेडकर एकत्र येतील यांची शक्यता कमीच आहे. मात्र, असे झाले तर महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरी आघाडी निर्माण होईल.

राष्ट्रवादीला सोडून आंबेडकरांशी युती आकड्यांच्या दृष्टिकोणातुनही परवडणारी नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर वंचित बहुजन आघाडीला जवळपास २५ लाख मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीला ९२ लाख मते मिळाली होती. राष्ट्रवादीला १६ टक्के आणि वंचितला ४.५८ टक्के मते मिळाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद अधिक आहे. पण या आघाडीत वंचित आली तर भाजपला मोठा फटका बसेल.

Prakash Ambedkar, Uddhav Thackeray, Sharad Pawar
आंबेडकरांच्या मदतीने ठाकरेंचा मुंबईत भाजप-शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न; वंचितच्या युतीने गणिते बदलतील

आंबेडकर आणि ठाकरे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा दिला जाऊ शकतो. त्याची चाचपणी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकते. त्या संदर्भाने हालचाली सुरु असल्याचे सांगितले जात आहे. तरी यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका महात्त्वाची असणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आणि एमआयएम यांनी युती झाली होती. मात्र, पुढे ही युती काही टिकली नाही. तसेच शिवसेनेत फुट पडल्यामुळे उद्धव ठाकरे यांना नवीन मित्रांची गरज आहे. महाविकास आघाडीत आता आंबेडकर येणार की नाही, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in