Karnataka Government : सिद्धरामय्या मुख्यमंत्री झाले; पण सरकार चालवताना करावी लागणार तारेवरची कसरत !

Siddaramaiah Government : सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच सिद्धरामय्यांपुढे मोठी आव्हाने
Siddaramaiah
SiddaramaiahSarkarnama

Siddaramaiah and D. K. Shivakumar : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३५ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला. दरम्यान, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार होते. या शर्यतीतून शिवकुमार बाहेर पडले. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री शिवकुमार बनले आहेत. आता सिद्धरामय्या सरकारपुढे दोन मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. त्या आव्हाना ते आता कसे सामोरे जातात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Siddaramaiah
Jayant Patil ED Enquiry : मला माहित आहे कशासाठी चौकशी होतेय; जयंत पाटलांनी कारणच सांगितलं

निवडणुकीत विजय झाल्याचे निश्चत होताच काँग्रेस नेते माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पहिल्याच बैठकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. त्यानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पाचही आश्वासनांची लवकरच पूर्तता करावी लागणार आहे. यात गृहलक्ष्मी, युवानिधी, अन्न भाग्य, गृह ज्योती, सखी योजना या आश्वासनांचा सामावेश आहे. या आश्वसनांच्या पूर्ततेसाठी कर्नाटकच्या तिजोरीवर प्रतिवर्षी सुमारे ६२ हजार कोटी रुपयांचा भार वाढणार आहे. हा खर्च गत वर्षीच्या वित्तीय तुटीएवढाचा असल्याचे एका आहवालात नमूद केले आहे. (Marathi Latest News)

Siddaramaiah
Chhagan Bhujbal News : लॉन्ड्रीमध्ये गुजरातहून आणलेली धुलाई पावडर; छगन भुजबळ, जयंत पाटलांच्या चौकशीवर थेटच बोलले

या निवडणुकीत काँग्रेसने भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. तो आरोप भाजपला (BJP) खोडता आला नाही. यासह दिलेल्या पाच आश्वासनांमुळे काँग्रेसला मोठा विजय मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे पाच आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सिद्धरामय्या (Siddaramaiah) सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. मात्र त्यासाठी प्रतिवर्षी लागणाऱ्या ६२ हजार कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे त्यांच्यापुढे पहिले मोठे आव्हान आहे.

Siddaramaiah
High court hearing on Sameer Wankhede Case: वानखेडेंना दिलासा कायम : तुर्तास अटक टळली

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यापुढे दुसरे आव्हान उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांचेच असणार आहे. मुख्यमंत्री बनण्याची महत्वकांक्षा बाळगलेल्या शिवकुमारांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. त्यासाठी पक्षश्रेष्ठींना त्यांची तब्बल पाच दिवस मनधरणी करावी लागली. त्यासाठी त्यांनी पाच अटी ठेवल्या.

त्यात महत्वाच्या खात्यांची जबाबदारी मिळणे, आपल्या आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुठलाही निर्णय विचारूनच घेणे, यांचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसने नियम डावलून शिवकुमारांकडे प्रदेशाध्यक्ष पदही कायम ठेवले. परिणामी उपमुख्यमंत्री असले तरी शिवकुमारांना काँग्रसने बळ दिल्याचेच दिसून येत आहे.

Siddaramaiah
Makai Sugar Factory Election : बागल विरोधकांचे सर्व अर्ज बाद : मकाई कारखान्यावर बागलांची चौथ्यांदा सत्ता

राजस्थानमध्ये (Rajasthan) काँग्रेसमधील अंतर्गत वाद सर्वश्रृत आहे. तशीच स्थिती कर्नाटकमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ती टाळण्याचा पक्षश्रेष्ठींनी पूर्ण प्रयत्न केला आहे. दरम्यान, शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये दोन्ही गटात समन्वय साधला आहे. मात्र भविष्यात सिद्धरामाय्या यांना पक्षश्रेष्ठींचा मोठा वरदहस्त असलेल्या शिवकुमारांची मर्जी सांभाळतानाही मोठी कसरत करावी लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com