Nana Patole News : नाना पटोलेंनी करुन दाखवलं; तीन विजयांमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला

Ravindra Dhangekar News : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसबा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला
Nana Patole, Ravindra Dhangekar News
Nana Patole, Ravindra Dhangekar News Sarkarnama

Kasba by-election : कसबा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसब्यामध्ये तळ ठोकत संपूर्ण काँग्रेस पक्षाला एकत्र केले होते. त्यामुळे गट-तट विसरुन काँग्रेसने काम केले.

विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर निवडणुकीतही काँग्रेसला (Congress) दणदणीत विजय मिळाला होता. त्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीत पक्षाला मिळालेला विजय नक्कीच आत्मविश्वास वाढवणारा आहे. नागपूर शिक्षक मतदार संघात भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. उमेदवारीवरून शेवटपर्यंत पक्षात गोंधळ झाला होता. तरीही शिक्षक मतदारांनी काँग्रेसला कौल दिला.

Nana Patole, Ravindra Dhangekar News
Kasba by-election News :...तर रवींद्र धंगेकर आज भाजपचे आमदार असते!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला (BJP) पारंपारिक शिक्षक मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. अमरावती पदवीधर मतदारसंघातही भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबे अपक्ष लढले आणि काँग्रेसने त्यांना पाठिंबा दिला नाही. नाहीतर या मतदार संघातही काँग्रेसचा विजय झाला असता. या मतदार संघात वेळेवर ठाकरे गटात प्रवेश केलेल्या शुभांगी पाटील यांना आघाडीने पाठिंबा दिला होता.

सत्यजित तांबे काँग्रेसकडून लढले असते तर तीन आमदार निवडून आले असते. पदवीधर आणि शिक्षकमध्ये काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले. हा जनतेचा कौल नाही, असे भाजपने म्हटले होते. पुण्यातील अनेक वर्ष भाजपचा मतदारसंघ म्हणून ओळक असलेल्या कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणूक जिंकून काँग्रेसने भाजपला चोख प्रत्युत्तर दिले. शिक्षक आणि पदवीधरप्रमाणेच विधानसभा पोटनिवडणुकीतही काँग्रेसने चुणूक दाखवून दिली आहे.

कसबा पेठ आणि शिक्षक, पदवीधर मतदारसंघांतील विजयांमुळे काँग्रेसचे बळ वाढले आहे. पक्षांतर्गत हेवेदावे असले तरी भाजपच्या विरोधात सामान्य जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे या निकालांवरुन दिसून येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेनंतर राज्यातील वातावरण काँग्रेसला अनुकूल झाल्याचा दावा पक्षाचे नेते करत आहेत.

महाराष्ट्र आणि काँग्रेस पक्ष हे समीकरण होते. मात्र, २०१४ पासून देशाप्रमाणेच काँग्रेसची राज्यात पिछेहाट झाली. २०१९ मध्ये तर काँग्रेस ४ क्रमांकावर गेली. कसबा पेठ, नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधरमधील विजयाने काँग्रेसला आगामी निवडणुकांना सामोरे जाताना बळ मिळाले. तसचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठीही हा विजय महत्त्वाचा आहे. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस चांगली कामगिरी करेल असा मेसेजही यामुळे गेला आहे.

Nana Patole, Ravindra Dhangekar News
Devendra Fadnavis : ''...तर कसब्याप्रमाणेच नागपूरमध्ये फडणवीसांचा पराभव शक्य!''; काँग्रेस नेत्याचं खळबळजनक विधान

विधान परिषदेच्या निकालानंतर पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत विजयामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे. नेतेमंडळींमधील गटबाजी, पक्षांतर्गत हेवेदावे यामुळे पक्षाची संघटना कमकुवत झाली असली तरी मतदार काँग्रेस बरोबर आहेत. त्यामुळे काँग्रेस एकसंघ राहिल्यास विजय सोपा होतो. हे नागपूर शिक्षमध्ये आणि आता कसब्यातही सिद्ध झाले आहे. काँग्रेस एकसंघ लढल्यास विजय मिळवू शकते, हा विश्वास येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांसाठी बळ देणार ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com