विमानतळावरच रंगले नाट्य...चंद्राबाबूंनी विमानतळातील फरशीवरच मारली बैठक!

आंध्र प्रदेशात पुन्हा एक नवीन राजकीय नाट्य सुरू झाले आहे. चंद्राबाबून नायडूंना विमानतळावर अडवण्यात आल्याने याची सुरवात झाले आहे.
TDP leader chandrababu naidu detained at renigunta airport in andhra pradesh
TDP leader chandrababu naidu detained at renigunta airport in andhra pradesh

चित्तूर : तेलगू देसम पक्षाचे प्रमुख व आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांना सोमवारी रेनिगुंटा विमानतळावर ताब्यात घेण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या नायडूंनी विमानतळातील फरशीवरच बैठक मारुन ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ उडाली. केवळ कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत विरोधी पक्षनेते असलेल्या नायडूंना प्रचार करण्यापासून रोखल्याने मोठा गदारोळ उडाला आहे. यामुळे दक्षिणेतील नव्या राजकीय नाट्याची सुरवात झाल्याचे चित्र आहे. 

आंध्र प्रदेशात महापालिका निवडणुका होत असून, प्रचाराला जोर चढला आहे. ते आज प्रचारासाठी चित्तूर जिल्ह्यात आले होते. मुख्यमंत्री जगनमोहन रेडडी सरकारच्या विरोधात ते आंदोलन करणार होते. मात्र, रेनिंगुंटा विमानतळातून बाहेर पडण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे संतप्त नायडूंनी विमानतळाच्या फरशीवरच बैठक मारत ठिय्या  आंदोलन सुरू केले. या अचानक झालेल्या आंदोलनाने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. तुम्ही मला का ताब्यात घेत आहात? हे काय नाटक चालवलं आहे? असे प्रश्न नायडू यांनी पोलिसांना विचारले.

याबाबत बोलताना पोलीस उपअधीक्षक रामना म्हणाले की, विरोधी पक्षनेते चंद्राबाबू नायडू यांनी ताब्यात घेण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस रेनिगुंटा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बजावली आहे. नायडू यांनी प्रचारासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती अथवा नाही याबद्दल नेमकी माहिती नाही. त्यांच्या आंदोलनामुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा आला असता. याचबरोबर कोविडची दुसरी लाट आली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी नायडूंना ताब्यात घेण्यात आले.  

यानंतर बोलताना नायडू म्हणाले की, मी चित्तूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणी निवेदन सादर करणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून तरी मला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना भेटण्याचा अधिकार नाही का? मला मूलभूत अधिकार नाहीत का? मी 14 वर्षे मुख्यमत्री होतो आणि आता विरोधी पक्षनेता आहे. तरीही अशी वागणूक मला दिली जात आहे. 

नायडू यांनी या प्रकरणी ट्विट केले असून, त्यात म्हटले आहे की, तुम्ही मला थांबवू शकत नाही. तुम्ही मला गप्प करू शकत नाही. तुमचा सरकारपुरस्कृत सूड जनतेपर्यंत पोचवण्यापासून मला रोखू शकत नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com