आघाडी तुटणार..? सहकारी पक्षाने अपमान केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या अश्रूंचा फुटला बांध

देशात चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तमिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू झाला आहे.
tamil nadu congress president k s alagiri wants to go alone in polls
tamil nadu congress president k s alagiri wants to go alone in polls

चेन्नई : तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि द्रमुकमध्ये जागा वाटपावरुन वाद सुरू झाला आहे. द्रमुकने अपमानास्पद वागणून दिल्याने अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष के.एस.अळगिरी यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यामुळे त्यांनी 'एकला चलो रे' भूमिका घेतली आहे. याबाबत आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार आहेत. 

द्रमुकने काँग्रेसला अतिशय कमी जागांचा प्रस्ताव दिला आहे. यानंतर काँग्रेसची अंतर्गत बैठक झाली. या बैठकीत बोलताना के.एस.अळगिरी भावनिक झाले आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. द्रमुकने काँग्रेसला अतिशय कमी जागा दिल्या असून, हा प्रस्ताव स्वीकारल्यास राज्यातून काँग्रेस नाहीशी होईल. यामुळे पक्षाने द्रमुकशी जागा वाटप करण्यासाठी माझ्याऐवजी दुसरा नेता नेमावा, असेही अळगिरी यांनी बैठकीत पक्षाला बजावले.  

अळगिरींच्या भावनिक बोलण्यानंतर बैठकीत काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची मागणी एकमुखाने केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची केली असली तरी केंद्रीय नेतृत्व यावर अंतिम निर्णय घेईल. परंतु, जागा वाटपावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये निर्माण झालेली कटुता कशी दूर होणार, हा प्रश्न आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव हे उपस्थित होते. मात्र, त्यांनी या सर्व प्रकारावर मौन धारण केले होते. 

पक्षाच्या राज्य नेतृत्वाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. हा प्रस्ताव पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यात झालेल्या अनेक जनमत पाहण्यांमध्ये सत्ताधारी अण्णाद्रमुक आणि विरोधी पक्ष असलेल्या द्रमुकमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. काँग्रेसने साथ सोडल्यास द्रमुकला मोठा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com