जगातील सर्वांत प्रभावशाली व्यक्तींमध्ये तालिबानी मुल्ला बरादर

अफगाणिस्तानमध्ये तालिबानकडून हंगामी सरकारची घोषणा करण्यात आली असून, उपपंतप्रधानपद मुल्ला अब्दुल गनी बरादर याच्याकडे देण्यात आले आहे.
talibans mullah baradar name included in time infulential people list
talibans mullah baradar name included in time infulential people list

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानकडून (Taliban) हंगामी सरकारची घोषणा करण्यात आली असून, मोहम्मद हसन अखुंद हा सरकारचं नेतृत्व करणार आहे. देशाचे पंतप्रधानपद अखुंद याच्याकडे तर उपपंतप्रधानपद मुल्ला अब्दुल गनी बरादर (Mullah Baradar) याच्याकडे देण्यात आले आहे. या बरादरचा समावेश आता टाईम (Time) नियतकालिकाने जगातील सर्वांत प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये (100 Most Infulential People of 2021) केला आहे. 

टाईम नियतकालिकाने जगातील सर्वांत प्रभावशाली 100 व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यात मुल्ला बरादरचा समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमेरिकेसोबत शांतता चर्चा करण्याची धुरा बरादर याच्यावर होती. दोहा येथे अनेक देशांशी तालिबानची चर्चेची प्रक्रिया सुरू होती. या चर्चेचे नेतृत्वही बरादर करीत होता. बरादर हा शांत स्वभावाचा मानला जातो. इतर तालिबानी नेत्यांप्रमाणे तो फारसा कट्टर नाही. अफगाणिस्तानमधील सत्ता हस्तगत करताना त्याने राजनैतिक मुसद्देगिरीच्या माध्यमातून केलेली चर्चा महत्वाची ठरली होती. 

गायब झालेला बरादर जिवंत सापडला 
बरादर हा काही दिवसांपासून गायब झाला आहे. यामुळे त्याच्या गायब होण्याबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. बरादरचा मृत्यू अथवा तो गंभीर जखमी झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले होते. अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय निवासात तालिबानच्या दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादात गोळीबार झाला होता. यातच बरादरचा मृत्यू अथवा तो गंभीर जखमी झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. अखेर तालिबानने बरादर जिवंत असल्याचा दावा केला आहे. त्याची ऑडिओ क्लिपही तालिबानने जारी केली आहे. 

तालिबानने नुकतेच मंत्रिमंडळ जाहीर केले. हे मंत्रिमंडळ अंतरिम असून त्यामध्ये आणखी काही मंत्र्यांच्या नावे समाविष्ट केली जाणार आहेत. पंतप्रधानपद मिळालेला अखुंद हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमर याचा सहकारी आहे. तो सध्या तालिबानमध्ये महत्वाचे निर्णय घेणाऱ्या परिषदेचा प्रमुख आहे. त्याचं नाव संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद्यांच्या यादीतही असल्याचं वृत्त आहे. याचबरोबर मुल्ला बरादर याच्याकडे उपपंतप्रधानपद देण्यात आले. 

तालिबानच्या राजकीय विभागाचा प्रमुख असलेला बरादर सरकारचं नेतृत्व करेल, अशी काही दिवसांपपर्यंत चर्चा होती. त्याला उपपंतप्रधानपद देण्यात आलं आहे. तोही तालिबानचा सहसंस्थापक आहे. अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केलेल्या हक्कानी नेटवर्कचा संस्थापकाचा मुलगा असलेला सराजुद्दीन हक्कानी यालाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्याकडं देशांतर्गत बाबींचे मंत्रिपद आलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com