तालिबानचं शेपूट वाकडंच! भारतीय दूतावासांवर छापा मारुन तोडफोन अन् कागदपत्रे, मोटारी पळवल्या

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सुरवातीला मवाळ भूमिका दाखवणाऱ्या तालिबानने अखेर खरे रंग दाखवण्यास सुरवात केली आहे.
taliban searches indian conulates in afghanistan
taliban searches indian conulates in afghanistan

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. भारताने (India) तेथील दूतावास (Consulate) बंद करुन सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मायदेशी परत आणले आहे. अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर सुरवातीला मवाळ भूमिका दाखवणाऱ्या तालिबानने अखेर खरे रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. तालिबानने भारताच्या दूतावासांवर छापा मारून तोडफोड केली आहे. दूतावासांतून कागदपत्रे आणि मोटारी तालिबानने नेल्या आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदाहार आणि हेरात येथील दूतावासांवर तालिबानने छापे मारले आहेत. तालिबान्यांनी दूतावासांची तपासणी करुन कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यांनी दूतावासामध्ये तोडफोड केली. नंतर दूतावासांच्या आवारात उभ्या असलेल्या भारताच्या मोटारी घेऊन ते गेले. भारताने हे अपेक्षित धरले होते. भारताचे अफगाणिस्तानमध्ये चार ठिकाणी दूतावास आहेत. तसेच, काबूलमध्येही दूतावास आहे. कंदाहार, हेरात आणि मझारे शरीफ येथील दूतावास तेथे तालिबान पोचण्याआधीच बंद करण्यात आले. काबूलमधील दूतावास अधिकृतरीत्या बंद करण्यात आलेला नाही. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तो अद्याप सुरू आहे. 

अफगाणिस्तानमधील राष्ट्रीय गुप्तचर संस्थेत काम करणाऱ्या अफगाणी नागरिकांनी शोधण्यासाठी तालिबानने घरोघरी जाऊन शोधमोहीम सुरू केली आहे. अमेरिका आणि नाटोसाठी काम करणाऱ्या अफगाणी नागरिकांचाही शोध तालिबानी घेत आहेत. याबाबतची माहिती संयुक्त राष्ट्रसंघाने दिली आहे. यामुळे तेथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालिबानने विरोधकांना माफ करण्याचे जाहीर केले असले तरी प्रत्यक्षा ते याच्या उलट पावले टाकत आहेत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला.

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे. या घडामोडींमुळे जगभरातील अनेक देशांनी गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com