"जीएसटी'चा परिपूर्ण कायदा आणण्यासाठी आम्ही "सुपर ह्युमन' नाही - सुरेश प्रभू

"जीएसटी'चा परिपूर्ण कायदा आणण्यासाठी आम्ही "सुपर ह्युमन' नाही - सुरेश प्रभू

पुणे : ""परिपूर्ण वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणण्यासाठी आम्ही काही "सुपर-ह्युमन' नाही. "सरकारने सर्व बाबींचा विचार केला नाही' अशी टीका करणाऱ्या लोकांनी गेली सत्तर वर्ष देशातील सत्ता "सुपर-ह्यमुन्स' प्रमाणे राबविली असती तर आज आपल्यासमोर इतक्‍या अडचणी राहिल्या नसत्या,'' अशी टीका केंद्रीय वाणिज्य व औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू यांनी कॉंग्रेस पक्ष व त्या पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केली. 

"कॉन्फेडेरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज'तर्फे (सीआयआय) पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रभू यांनी विविध क्षेत्रातील उद्योजकांशी संवाद साधला. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली. 

"जीएसटी' विषयी बोलताना प्रभू म्हणाले, ""जुन्या प्राप्तिकर कायद्याचे रुपांतर स्वातंत्र्यानंतर 1961 मध्ये नव्या कायद्यात झाले. त्यानंतरही त्यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सुधारणा बहुतांश सकारात्मक होत्या. साठ वर्षाहून जुन्या कायद्यामध्ये इतक्‍या सुधारणा कराव्या लागल्या कारण तुम्ही एका "परफेक्‍ट' कायद्याचा विचार नाही करू शकला. या तुलनेत जीएसटी किती जुना आहे? तर सहा महिनेसुद्धा पूर्ण झालेले नाहीत. हा कायदा अजून विकसित (इव्हॉल्व) होत आहे.'' 

""जीएसटीमध्ये सुधारणा करण्याबाबत सरकारचा प्रतिसादही तितकाच सकारात्मक होता. काही लोक टिका करतात की तुम्ही सर्व गोष्टींचा विचार केला नाही.. पण फक्त "सुपर-ह्युमन'च असा विचार करू शकतात. जर अशा लोकांनी गेली साठ वर्ष देशातील सत्ता सुपर-ह्यमुन्स प्रमाणे राबविली असती तर आज आपल्यासमोर इतक्‍या अडचणी नसत्या,'' असे प्रभू म्हणाले. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in