सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांना विनंती...ग्रंथालये, अभ्यासिका सुरू करा.... - Supriya Sule request to the Chief Minister start libraries | Politics Marathi News - Sarkarnama

सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांना विनंती...ग्रंथालये, अभ्यासिका सुरू करा....

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

मुंबई : लॅाकडाउनपासून राज्यात बंद असलेली ग्रंथालये आणि अभ्यासिका तातडीने सुरू करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयास पत्र दिले आहे. ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या नेहमीच पुढाकार घेत आहेत. ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. सुळे म्हणाल्या की ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री लवकर विद्यार्थ्यांना गोड बातमी देतील, अशी अपेक्षा आहे.  
 
जिम, सिनेमागृह, हॉटेल व्यावसायिक यानतंर आता विद्यार्थ्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापूर्वी सिनेमागृह, हॅाटेल पुन्हा सुरू करण्याबाबत मागणी केली होती. याबाबत त्यांनी टि्वट केलं होतं. लॅाकडाउनमुळे राज्यातील हॉटेल,  व्यावसायिक रेस्टॉरंट चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होतं. यावर तोडगा काढण्याची विनंती त्यांनी सरकारला केली होती.

संबंधित लेख