आतापर्यंत किती जणांना अटक केली? सर्वोच्च न्यायालयाने भाजप सरकारला धरले धारेवर

सर्वोच्च न्यायालयाने आज भाजप सरकारला धारेवर धरले. या प्रकरणी किती जणांना आतापर्यंत अटक केली, असा संतप्त सवालही न्यायालयाने केला.
आतापर्यंत किती जणांना अटक केली? सर्वोच्च न्यायालयाने भाजप सरकारला धरले धारेवर
supreme courtsarkarnama

लखीमपूर खिरी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खिरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेला चार दिवस उलटूनही केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला अटक झालेली नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयाने आज भाजप सरकारला धारेवर धरले. या प्रकरणी किती जणांना आतापर्यंत अटक केली, असा संतप्त सवालही न्यायालयाने केला.

सर्वोच्च न्यायालय म्हणाले की, या प्रकरणी आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली याचा अहवाल उद्या न्यायालयात सादर करावा. आतापर्यंत या प्रकरणी किती जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेले ८ जण कोण होते याची सविस्तर माहिती सादर करावी. ते शेतकरी होते, पत्रकार होते अथवा इतर कोण होते? ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. तुम्ही कुणावर गुन्हा दाखल केला याचीही माहिती आम्हाला द्या.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्याने 3 ऑक्टोबरला आठ जणांना चिरडले होते. यात चार शेतकऱ्यांचा समावेश होता. अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष हा मोटार चालवत होता आणि त्यानेच शेतकऱ्यांना चिरडल्याचा दावा करण्यात आला असून, पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. परंतु, या प्रकरणात त्याला अद्याप अटक झालेली नाही.

लखीमपूर खिरीतील घटनेमुळे भाजप सरकार अडचणीत आले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना ताब्यात घेतले जात होते. पोलिसांनी लखीमपूर खिरीमध्ये जमावबंदी लागू केली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेऊन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. याचबरोबर या प्रकरणी न्यायिक चौकशी करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

supreme court
देशात सर्वांत स्वस्त अन् महाग पेट्रोल कुठं मिळतं? जाणून घ्या...

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेली वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला आले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

supreme court
सात जणांच जाणं मोदींच्या मनाला चटका लावून गेलं; पाच लाखांची नुकसान भरपाई जाहीर

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा काल दुपारी तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मौर्य यांनी भवानीपूर गावातील आपला दौरा रद्द केला होता.

Related Stories

No stories found.