सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सुनावणीवेळी आठवले लोकमान्य टिळकांचे 'ते' शब्द...

एका प्रकरणाच्या ऑनलाईन सुनावणीवेळी चंद्रचूड यांनी रोहतगी यांच्या मागील भिंतीवर लावलेली चित्र ओळखले.
सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना सुनावणीवेळी आठवले लोकमान्य टिळकांचे 'ते' शब्द...
Lokmanya Tilak

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ऐतिहासिक संदर्भ दिला. माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या मागील बाजूस भिंतीवर लोकमान्य टिळकांचे एक चित्र त्यांना दिसले. हे चित्र टिळकांविरोधातील एका खटल्याचे होते. त्याचा संदर्भ देत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी टिळकांचे त्यावेळचे शब्द ऐकवले.

एका प्रकरणाच्या ऑनलाईन सुनावणीवेळी चंद्रचूड यांनी रोहतगी यांच्या मागील भिंतीवर लावलेली चित्र ओळखले. ते चित्र कधीचे आहे, तसेच त्यावेळी टिळक काय म्हणाले, होते हेही चंद्रचूड यांनी सांगितले. 'पंचांच्या निर्णयानंतर मी निद्रोष असल्याचे मानतो. न्यायासनाहून महान आणि चराचर सृष्टीचे नियंत्रण करणाऱ्या काही शक्ती अस्तित्वात आहेत. विधात्याची इच्छा असेल तर स्वतंत्र राहण्यापेक्षा बंदिवासातही माझ्या हातून माझे काम पूर्ण होईल,' असं टिळक म्हणाले होते.

Lokmanya Tilak
राज्यपालांचा नवा वाद; आमदारांना शपथ देण्याचे विधानसभा अध्यक्षांचे अधिकारच काढले!

रोहतगी यांच्या मागे असलेले चित्र 1908 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या खटल्यावरील सुनावणीचे होते. चंद्रचूड यांनी अनेक वर्ष मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली आहे. त्यानंतर या न्यायालयात त्यांनी अनेक वर्ष न्यायाधीश म्हणूनही नियुक्त होते. ते न्यायालयात वकील असताना दररोज न्यायालयात लावलेल्या टिळकांची विधाने वाचत होते. त्यामुळं त्यांना सुनावणीदरम्यान टिळकांची सुनावणीवेळीची वाक्य आठवली.

लोकमान्य टिळकांचा 1908 चा खटला ऐतिहासिक आहे. उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत या खटल्याची सुनावणी झाली होती. याच सुनावणीवेळच्या सुनावणीचे चित्र भिंतीवर लावले होते. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही चित्र न्यायालयात आहेत. उच्च न्यायालयाची इमारत ऐतिहासिक वास्तू म्हणून प्रसिध्द आहे.

Related Stories

No stories found.