कारवाईपासून संरक्षण नाहीच; देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
supreme court denies any relief to anil deshmukh
supreme court denies any relief to anil deshmukh

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दणका दिला आहे. सक्त वसुली संचालनालयाला (ED) आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखावे, अशी मागणी देशमुखांनी न्यायालयाकडे केली होती. देशमुखांची ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

ईडीने यापूर्वी देशमुखांना अनेक वेळा समन्स बजावले आहे. यावर त्यांनी आपल्या वकीलामार्फत उत्तर दिले होते. ईडीला सहकार्य करणार असल्याचे त्यांनी टि्वट केले होते. ईडीने तिसरे समन्स बजावल्यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. त्यानुसार त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत दाद मागितली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम.खानविलकर, कृष्णा मुरारी आणि व्ही.सुब्रह्मण्यम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. 

खंडपीठाने देशमुखांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिली. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार इतर मुभा मिळवण्यास त्यांना स्वातंत्र्य आहेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. देशमुख यांच्या वतीने बाजू मांडताना विक्रम चौधरी म्हणाले की, देशमुखांच्या विरोधात सु़डाचे राजकारण सुरू आहे. ईसीआयआर संदर्भात कागदपत्रे आणण्यास देशमुखांना सांगण्यात आले होते. परंतु, ईडीने त्यांना आणखी एक समन्स बजावले. तसेच, त्यांचे सचिव आणि स्वीय सहायक यांना अटक केली. 

दरम्यान, देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे Sanjeev Palande व स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे या दोघांना ईडीने आधीच अटक केली आहे. आयपीएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि विशेषकरून बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांची भूमिका होती, असे त्यांचा संजीव पलांडे याने जबाबात सांगितल्याचा दावा ईडीने केला आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर व वरळी  येथील घराची ईडीने झाडाझडती घेतली.  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल देशमुख यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.     

अनिल देशुख यांच्या भष्ट्रपद्धतीबाबत आपल्याला बळीचा बकरा बनविला गेले, असा आरोप परमबीरसिंह यांनी केला आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील घर व कार्यालयावर छापा टाकला होता. यात त्यांना काही कागदपत्रात अफरातफर केल्याचे आढळले होते. ईडीकडून अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशमुखांच्या दोन्ही घरांवर छापे टाकले आहेत.  परमबीरसिंह यांनी लिहिलेल्या आठ पानी पत्रांत गृहमंत्र्यांनी वाझेला बोलावून कसे हफ्ते गोळा करायला सांगितले, हे सविस्तर लिहिले होते. याबाबत झालेल्या बैठकांना गृहमंत्र्यांचे खासगी सचिव संजीव पलांडे हे पण उपस्थित होते, असा उल्लेख परमबीरसिंह यांनी होता.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com