भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मोदींना पुन्हा एकदा जाहीरपणे आणलं अडचणीत

भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा जाहीरपणे अडचणीत आणले आहे.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने मोदींना पुन्हा एकदा जाहीरपणे आणलं अडचणीत
Subramanian Swamy and Narendra Modi

नवी दिल्ली : भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा एकदा जाहीरपणे अडचणीत आणले आहे. मोदींच्या विरोधात बोलण्याची शिक्षा त्यांना नुकतीच मिळाली होती. त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून डच्चू मिळाला होता. तरीही स्वामींनी मोदींना पुन्हा सुनावले आहे.

भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली. या कार्यकारिणीमधून स्वामींना वगळण्यात आले होते. मागील काही दिवसांपासून स्वामी हे आपल्याच सरकारला लक्ष्य करताना दिसत आहेत. तसेच, वरूण गांधी आणि त्यांच्या मातोश्री खासदार मेनका गांधी यांनाही कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला होता. तर काही महिन्यांपूर्वी पक्षात दाखल झालेले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व मिथुन चक्रवर्ती यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले होते. याचवेळी शेतकरी आंदोलनावरून सरकार टीका करणारे माजी केंद्रीय मंत्री चौधरी विरेंदरसिंह यांना वगळले होते.

आता स्वामींना पुन्हा एकदा जाहीरपणे अडचणीत आणले आहे. स्वामींनी नुकतीच राम सेतूचा हवाई दौरा केला. हा सेतू तमिळनाडूतील मुन्नार खाडीत असून, तो रामेश्वरमला श्रीलंकेतील जाफनाशी जोडतो. स्वामींनी हे फोटो ट्विट करीत थेट मोदींना सवाल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मोदी याला राष्ट्रीय वारसा म्हणून जाहीर का करीत नाहीत? त्यांना असे करण्यापासून कोण रोखत आहे.

Subramanian Swamy and Narendra Modi
मंत्र्याच्या पुत्राला गुन्हे शाखेत हलवले; मॅरेथॉन चौकशी सुरू

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्वामींना स्थान देण्यात आले नव्हते. काही दिवसांपूर्वी याबाबत एका व्यक्तीने स्वामी यांनी ट्विटरवर छेडले होते. तुम्हाला मंत्रिपद न मिळाल्याने तुम्ही भाजप सरकारवर टीका करीत आहात, असा आरोप त्या व्यक्तीने केला होता. यावर स्वामी यांनी उत्तर देताना थेट मोदींवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटले होते की, मी मोदीविरोधी आहे. माझा मोदींच्या आर्थिक व परराष्ट्र धोरणांना विरोध आहे. यासंबंधी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींशी समोरासमोर चर्चा करण्यासही मी तयारी आहे. तुम्ही सहभागाच्या तत्वावर चालणारी लोकशाही ऐकली आहे का? मोदी हे काय भारताचे राजे नाहीत.

Subramanian Swamy and Narendra Modi
तालिबानच्या राजवटीत मुली शाळांमध्ये परतल्या पण...

राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी यांच्यासह 80 नेत्यांचा समावेश आहे. त्यांच्याशिवाय 50 विशेष निमंत्रित व 179 स्थायी निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. एकूण 309 सदस्यांचा समावेश या कार्यकारिणीमध्ये करण्यात आला आहे. पक्षाचे केंद्रीय पदाधिकारी, सर्व विभागांचे अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवक्ते, सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधीमंडळातील नेते, माजी मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री, सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व राज्यांचे प्रभारी, सह प्रभारी आदींचा समावेश आहे. पक्षाचे 13 उपाध्यक्ष असतील. तर सात जणांवर राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.