बदलाच्या वावटळीत रावसाहेब दानवेंनी मंत्रिपद राखलं - State Minister Raosaheb Danve still in Union Cabinet | Politics Marathi News - Sarkarnama

बदलाच्या वावटळीत रावसाहेब दानवेंनी मंत्रिपद राखलं

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारामध्ये किमान 11 मंत्र्यांना नारळ दिला आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होत असताना महाराष्ट्रातील केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचाही राजीनामा घेण्यात आल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, आता त्यावर पडदा पडला असून दानवे यांचे मंत्रिपद सुरक्षित राहिले आहे. राज्यातील संजय धोत्रे आणि प्रकाश जावडेकर यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील चौघांना स्थान मिळाले आहे. (State Minister Raosaheb Danve still in Union Cabinet)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाच्या मेगाविस्तारामध्ये किमान 11 मंत्र्यांना नारळ दिला आहे. दानवे यांच्यासह संजय धोत्रे यांचा राजीनामा घेतल्याची चर्चा आज दिवसभर सुरू होती. पण अखेर त्यावर पडदा पडला आहे. दानवे यांचा राजीनामा मागण्यात आलेला नाही, हे अखेर सायंकाळी स्पष्ट झालं. राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारलेल्या मंत्र्यांच्या यादीत दानवे यांचे नाव नाही. धोत्रे आणि जावडेकर यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होत असताना झालेल्या बदलांच्या वावटळीत आपलं मंत्रिपद टिकवण्यात दानवे यांना यश आल्याचं दिसतं. 

हेही वाचा : राजीनामा दिला अन् केंद्रीय मंत्री म्हणाले, धूर निघाला म्हणजे आग लागलीय!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार केला जाणार आहे. महाराष्ट्रातील चौघांसह एकूण 43 जणांचा शपथविधी आज होणार आहे. या नावांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये नारायण राणे, भारती पवार, भागवत कराड आणि कपिल पाटील या चौघांचा समावेश आहे. तसेच जोतिरादित्य शिंदे, सर्वानंद सोनोवाल, अनुराग ठाकूर, किरण रिजिजू, हरदीप सिंग पुरी यांच्यासह काही नव्या-जून्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

आजच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराआधी कालपासून जवळपास 10 हून अधिक केंद्रीय मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे. त्यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री डॅा. हर्ष वर्धन, शिक्षण मंत्री शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक, केंद्रीय कामगारमंत्री संतोषकुमार गंगवार, केंद्रीय रसायन मंत्री सदानंद गौडा आणि केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी यांच्यासह शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कालच थावरचंद गेहलोत यांनी केंद्रीय मंत्रिपदावरुन राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. 

तसेच काही मंत्र्यांची खाती बदलण्यात येणार आहेत. त्यामध्ये हरदीप सिंग पुरी, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर आदींचा समावेश आहे. अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आल्याचे दिसते. आज 43 जणांचा शपथविधी होणार असून त्यांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. 

हे घेणार आज शपथ :

1. नारायण राणे (महाराष्ट्र), 2. सर्वानंद सोनोवाल, 3. डॅा. विरेंद्र कुमार
4. जोतिरादित्य शिंदे, 5. रामचंद्र प्रसाद सिंग, 6. अश्विनी वैष्णव
7. पशुपती कुमार पारस, 8. किरण रिजिजू, 9. राज कुमार सिंग
10. हरदिप सिंग पुरी, 11. मनसुख मांडलीय, 12. भूपेंद्र यादव
13. पुरषोत्तम रुपाला, 14. अनुराग ठाकूर, 15. पंकज चौधरी
17. अनुप्रिया सिंग पटेल, 18. डॅा. सत्यपाल सिंग बघेल, 19. राजीव चंद्रशेखर
20. शोभा करंदालजे, 21. भानू प्रताप सिंग वर्मा, 22. दर्शना विक्रम जरदोश
23. मिनाक्षी लेखी, 24. अन्नपुर्णा देवी, 25. ए. नारायणस्वामी
26. कौशल किशोर, 27. अजय भट, 28. बी. एल. वर्मा, 29. अजय कुमार
30. देवुसिंह चौहान, 31. भगवंत खुबा, 32. कपिल पाटील (महाराष्ट्र)
33. प्रतिमा भौमिक, 34. डॅा. सुभाश सरकार, 35. डॅा. भागवत कराड (महाराष्ट्र)
36. डॅा. राजकुमार रंजन सिंग, 37. डॅा. भारती पवार (महाराष्ट्र)
38. बिश्वेश्वर टुडू, 39. शंतनू ठाकूर, 40. डॅा. मुंजापरा महेंद्रभाई
41. जॅान बारला, 42. डॅा. एल. मुरूगन, 43. निसिथ परमाणिक

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख