भाजपची खेळी; विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीत थेट विरोधी पक्षातील आमदाराला उमेदवारी

या निवडणुकीसाठी सोमवारी सहा तासांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे.
BJP
BJPsarkarnama

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) विधानसभेची निवडणूक (Assembly Election) सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. असं असतानाही विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांची निवडणूक हे त्यामागचं कारण आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय खेळी करत भाजपन विरोधी पक्षातील आमदारालाच तिकीट दिलं आहे. त्यामुळं एकाच पक्षातील दोन उमेदवार एकमेकांविरोधा उभे ठाकणार आहेत.

भाजपने ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल (Naresh Agrawal) यांचे पुत्र नितीन अग्रवाल (Nitin Agrawal) यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. भाजप समर्थित उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नितीन हे सध्या अधिकृतपणे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. नरेश अग्रवाल काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पण अद्याप नितीन यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाही. त्यामुळे आता नितीन यांनीही भाजपचा पाठिंबा घेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं समाजवादी पक्षाला धक्का बसला आहे.

BJP
काँग्रेसला झटका; पक्षासाठी काम करणाऱ्या कंपनीवर 'प्राप्तीकर'चा छापा

या निवडणुकीत सपाच्या उमेदवारानंही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सपामधीलच दोन आमदार या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढणार असल्याचे चित्र आहे. परंपरेनुसार उपाध्यक्षांच पद विरोधी पक्षाला दिले जाते. पण नितीन अग्रवाल हे अजूनही सपाचेच आमदार असल्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी त्यांनाच तिकीट देत राजकीय डाव टाकला. योगींसह अन्य काही मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

नरेश अग्रवाल हे अनेक वर्ष सपामध्ये होते. हरदोई मतदारसंघातून ते सात वेळा निवडून आले आहेत. ते राज्यसभेचे खासदारही होते. काही वर्ष काँग्रेसमध्येही त्यांनी काम केले आहे. सध्या ते भाजपमध्ये आहेत. अग्रवाल समाजाला खूष करण्यासाठी निवडणुकीच्या तोडांवर नितीन यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी सहा तासांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे.

BJP
सिध्दू लागले कामाला; थेट सोनियांना पत्र लिहित करून दिली आश्वासनांची आठवण

दरम्यान, उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आगामी निवडणुकीत पक्षाला 300 जागा मिळतील, असा दावा केला आहे. सध्या पक्षाचे 50 आमदार आहेत. भाजपकडून 150 जणांना तिकीट दिले जाणार नाही. तर 100 आमदार मुख्यमंत्र्यांविरोधात विधानसभेतच आंदोलन केले होते. त्यामुळे आम्हाला 300 जागा मिळतील, असं गणित अखिलेश यांनी मांडलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com