शेहला रशीदला तिच्या वडिलांनी देशद्रोही ठरवण्यामागील नेमकं कारण काय...

सामाजिक कार्यकर्ती शेहला रशीद हिला तिच्या वडिलांनीच देशद्रोही ठरवले असून, यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे.
social activist shehla rashid father says my daughter is anti national
social activist shehla rashid father says my daughter is anti national

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनामुळे प्रसिद्धीच झोतात आलेली विद्यार्थिनी आणि सामाजिक कार्यकर्ती शेहला रशीद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती चर्चेत येण्यामागे कारण आहेत तिचे वडील. शेहला हिच्यावर तिच्या वडिलांनीच देशद्रोहाचे आरोप केले आहेत. शेहलानेही या आरोपांना उत्तर दिले असून, माझ्या वडिलांनी केलेली वक्तव्ये ही त्यांच्याबाबतचीच असल्याचे म्हटले आहे. 

शेहलाचे वडील अब्दुल रशीद शोरा यांनी 30 नोव्हेंबरला शेहलाच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. तिच्यापासून जिवाला धोका असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. माझी मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचेही त्यांनी म्हटले होते. शेहलावर तिच्या वडिलांनी असे आरोप करण्यामागील खरे कारण हे घरातील संघर्षाचे आहे. याआधीही तिचा आणि वडिलांमध्ये वादाचे प्रसंग घडले होते. 

यापूर्वी शेहलाने वडिलांवर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. माझी बहीण आणि आईही त्यांच्याविरोधात असल्याचे तिने म्हटले आहे. तिने ट्विटरवर म्हटले आहे की, लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. यापुढे मी कोणत्याही वृत्तवाहिनीवरील चर्चेच सहभागी होणार नाही अथवा मुलाखतही देणार नाही. आपल्याच कुटुंबीयांची प्रतिमा कलुषित करणे हे माझ्यावर झालेल्या संस्काराच्या विरोधात आहे. माध्यमांमधील सहकारी या वक्तव्याची नोंद घेऊ शकतात.

शेहलाने तिच्या ट्विटरवरून एक आदेशही शेअर केला आहे. यामध्ये न्यायालयाने तिच्या वडिलांना घरी जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शेहलाने तिच्या वडिलांविरोधात पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ती न्यायालयातही गेली होती. या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेला विलंब लावण्यासाठी वडील असे आरोप करीत असल्याचे शेहलाचे म्हणणे आहे. वडिलांपासून खूप आधीच वेगळे राहत असल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com