मोठी बातमी : ब्रिटनमध्ये अदर पूनावाला करणार 2 हजार 200 कोटींची गुंतवणूक - SII ceo adar poonawalla will invest 334 million dollors in uk | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

मोठी बातमी : ब्रिटनमध्ये अदर पूनावाला करणार 2 हजार 200 कोटींची गुंतवणूक

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 मे 2021

सिरमने ब्रिटनमध्ये लस उत्पादन प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सिरमकडून ब्रिटनमध्ये 2 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. 

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची सुनामी आली आहे. यामुळे देशात कोरोना लशीची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताने लशीच्या निर्यातीवर निर्बंध घातले आहे. या निर्बंधामुळे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून इतर देशांना लस मिळत नसल्याचे चित्र आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सिरमने ब्रिटनमध्ये प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांकडून ब्रिटनमध्ये 30 कोटी डॉलरची ( सुमारे 2 हजार 200 कोटी रुपये) गुंतवणूक केली जाणार आहे. (Adar Poonawalla will invest 334 million dollors in UK)

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी याबद्दल घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ब्रिटनमझ्ये गुंतवणूक करणार आहे. भविष्यात सिरम ब्रिटनमध्ये लस उत्पादन सुरू करणार आहे. सिरम 33.4 कोटी डॉलरची (सुमारे 2 हजार 200 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. सिरमचा हा प्रकल्प विक्री कार्यालय, वैद्यकीय चाचण्या, संशोधऩ आणि विकास असा असणार आहे. तसेच, उत्पादन प्रकल्पाचाही यात समावेश असू शकतो. 

जगातील आघाडीची लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरमने अॅस्ट्राझेनेकाच्या कमी खर्चिक कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. याचबरोबर नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लशीची चाचणीही सिरमने ब्रिटनमध्ये सुरू केली आहे. युरोपीय युनियनमधून बाहेर पडल्यानंतर ब्रिटन गुंतवणूकदारांना देशात गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. या अंतर्गत भारतातून तब्बल 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक ब्रिटनमध्ये होणार आहे. यातून ब्रिटनमध्ये 6 हजार 500 रोजगार निर्माण होणार आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्यात आज व्हर्च्युअल माध्यमातून संवाद होणार असून, याआधीच याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. 

अदर पूनावाला यांनी नकुत्याच दिलेल्या मुलाखतीत देशाबाहेर लस उत्पादन सुरु करण्याचे सूतोवाच केले होते. सिरमने इतर देशांसोबत लस पुरवठ्यासाठी करार केले आहेत. या करारानुसार या देशांना लसपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे इतर देशांमध्ये उत्पादन प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन सिरमने केले आहे. 

ब्रिटनने भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याआधीच आठ दिवसांपूर्वी अदर पूनावाला लंडनमध्ये दाखल झाले आहेत. सिरमची लस उत्पादनाची क्षमता जुलैपर्यंत दरमहा 10 कोटी डोसपर्यंत जाऊ शकेल. पुढील सहा महिन्यांत सिरमची वार्षिक उत्पादन क्षमता अडीच अब्ज डोसवरुन 3 अब्ज डोसवर नेण्याचा प्रयत्न आहे, असेही पूनावालांनी म्हटले आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. आता रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरासही केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख