शिवसेना पुन्हा विरोधी गोटात; राज्यसभा उपसभापतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा

राज्यसभा उपसभापती पदाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू असल्याची किनार याला आहे.
shivsena will support opposition candidate in rajya sabha deputy chairman election
shivsena will support opposition candidate in rajya sabha deputy chairman election

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा या दोन प्रकरणांवरुन  राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. आता शिवेसेनेने राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा थेट भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन आव्हान दिले आहे. राज्यसभेच्या उपसभापतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते मनोज झा हे विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. 

मनोज झा यांनी 11 सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राज्यसभा उपसभापतिपदासाठी ते विरोधी पक्षांचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार व संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) खासदार हरिवंशसिंह यांचे आव्हान आहे. उपसभापतिपदाचा हरिवंशसिंह यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपल्याने हे पद रिकामे झाले होते. आता यासाठी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे उद्याच (ता.14) निवडणूक होत आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनोज झा यांना आज शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला. ते म्हणाले की, राज्यसभा उपसभापतिपदासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा आहे. 

राज्यसभेचे एकूण संख्याबळ 245 असून, एनडीए उमेदवाराचा विजय सहज मानला जात आहे. कारण तेलंगण राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल, अण्णाद्रमुक या पक्षांचा पाठिंबा एनडीएच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता आहे. उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून ते 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाता प्रश्नोत्तराचा तास असणार नाही. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ट पोस्ट फॉरवर्ड करणाऱ्या मदन शर्मा या निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी मारहाण केली होती. कंगना प्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या भाजपला यामुळे आयताच मुद्दा मिळाला आहे. भाजपने या अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरुन रान उठविण्यास सुरूवात केली आहे. 

याचा समाचारही संजय राऊत यांनी घेतला. ते म्हणाले की, महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. अशा प्रकारची घटना कोणाबाबतही घडू शकते. उत्तर प्रदेशात किती निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांवर हल्ले झाले हे तुम्हाला माहिती आहे का? परंतु, त्यांना संरक्षण मंत्री कॉल करीत नाहीत. कोणताही निष्पाप व्यक्तीवर हल्ला होऊ नये, अशी आमच्या सरकारची भूमिका आहे. 

महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. राज्यात कायद्याचा आदर केला जातो. यामुळेच या प्रकरणातील आरोपींना आम्ही तातडीने अटक केली. ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत याचा अजिबात विचार करण्यात आला नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com