अंकुश राणेची हत्या अन् चिंटू शेखवर गोळीबार कुणी केला?

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या सख्ख्या चुलत भावाची हत्या आणि चिंटू शेखवरील गोळीबार ही प्रकरणे आता उकरून काढले आहे.
shivsena mp vinayak raut targets union minister narayan rane
shivsena mp vinayak raut targets union minister narayan rane

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असा सामना सुरू आहे. राणेंनी शिवसेनेवर गंभीर आरोप केल्यानंतर याला प्रत्युत्तर मिळाले आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी राणेंच्या सख्ख्या चुलत भावाची हत्या आणि चिंटू शेखवरील गोळीबार ही प्रकरणे आता उकरून काढले आहे. 

खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे की, नारायण राणे इतरांवर आरोप करतात पण त्यांचा सख्खा चुलत भाऊ अंकुश राणेची हत्या कुणी केली? हत्या केल्यानंतर त्याला कोणत्या गाडीत टाकले आणि जाळले याची विचारपूस तुम्ही कधी केली का? तुमच्या मुलाने चिंटू शेखला ऑफिसात जाऊन गोळ्या घातल्या. त्याचीही कधी विचारपूस तुम्ही केली आहे का? राणेंचे काय धंदे चालतात हे आम्हाला उकरुन काढायचे नाही. परंतु, भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद आणि विधानसभेत नारायण राणेंची कुंडली वाचून दाखवली होती. त्याचा अभ्यास आता महाराष्ट्र सरकारला करायला सांगणार आहे. 

नारायण राणे यांच्या अटकेनंतर काल पुन्हा जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीमध्ये सुरु झाली. त्यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला आव्हान दिले होते. ते म्हणाले होते की, भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? रमेश मोरे आणि जया जाधवची हत्या कशी झाली? आम्हालाही जुनी प्रकरणे माहिती आहेत. त्याचे कारण काय हेसुद्धा माहिती आहे. आपल्याच बंधूच्या पत्नीवर अॅसिड फेकायला कोणी कोणाला सांगितले हे माहिती आहे. टप्प्याटप्प्याने सगळे बाहेर काढणार. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सॅलियनची केस संपलेली नाही. मी केंद्रात मंत्री असून, तुम्ही मला किती दिवस अटक करणार आहात. 

नारायण राणे हे विरोधकांवर नियमितपणे आरोप करतात. मात्र, त्यांनी उल्लेख केलेले अॅसिड फेकण्याचे प्रकरण नक्की काय आहे, त्यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. अॅसिड फेकण्याचा उल्लेख करुन नारायण राणे आता कोणता गौप्यस्फोट करणार असा प्रश्न विचारला जात आहे. यातच शिवसेनेनेही जुनी प्रकरणे उकरून काढून राणेंना कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com