Shivijaro Adhalrao Patil News : चंद्रकांतदादांनी कोल्हेंबाबत संकेत देताच आढळरावांकडून ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात!

आढळराव यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत सलगी वाढताना दिसत आहे आणि ती सहाजिकही आहे.
Dilip Walse Patil-Dilip Mohite-Shivajirao Adhalrao Patil
Dilip Walse Patil-Dilip Mohite-Shivajirao Adhalrao PatilSarkarnama

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून (NCP) फटकून वागत आहेत. त्यांच्या भाजप (BJP) प्रवेशाची चर्चाही काही महिन्यांपासून चविने चर्चिली जात आहे. त्यातच साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी खासदार कोल्हे यांच्याबाबत भाष्य केले. दुसरीकडे, कोल्हेंनी ऐनवेळी भाजपत प्रवेश केला तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनीही ‘फिल्डिंग’ची लावायला सुरुवात केल्याचे त्यांच्या राष्ट्रवादीसोबच्या वाढत्या सलगीवरून दिसून येत आहे. (Shivajirao Adhalrao Patil's association with NCP increased)

खासदार अमोल कोल्हे यांनी काही महिन्यांपूर्वी ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. तो चित्रपट पाहावा, यासाठी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. तेव्हापासून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. त्यानंतर झालेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असूनही ते निवडणुकीपासून अलिप्त राहिले होते. एकीकडे कोल्हे हे पक्षापासून हातचे राखून वागत होते, तर दुसरीकडे पक्षाचे नेतेही त्यांच्याबाबत बोलायला तयार नव्हते. त्यातच कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातही फिरकत नव्हते, त्यामुळे कोल्हे यांच्याविषयी मतदारसंघात संभ्रम वाढत गेला.

Dilip Walse Patil-Dilip Mohite-Shivajirao Adhalrao Patil
Pune Politics : एकमेकांवर तोंडसुख घेणारे दिलीप मोहिते-आढळराव पाटील रंगले हास्यविनोदात!

ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झालेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या जागावाटपात शिरूर मतदारसंघ शिवसेनेला सुटेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांनी जुन्या सवंगड्यांना सोबत घेऊन विजयाचे आडाखे बांधायला सुरू केली होती. मात्र, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि आढळरावांच्या पोटात गोळाच आला असावा.

चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाच्या मुद्यावर बोलताना नेमकं खासदार अमोल कोल्हे यांचंच उदाहारण दिलं. ते म्हणाले की, समजा खासदार कोल्हे यांनी लोकसभा निवडणुकीच्या चार महिने अगोदर भाजपत प्रवेश केला तर विद्यमान खासदार असल्यामुळे कोल्हेंना उमेदवारी द्यावी लागेल. हा मतदारसंघ भाजपला सोडावा लागेल. अशावेळी आम्हाला आढळराव पाटील यांची समजूत घालावी लागेल, असेही त्यांनी सांगितले. म्हणजेच कोल्हे यांचे राष्ट्रवादीशी फटकून वागणे आणि चंद्रकांतदादांनी नेमकं त्यांचंच उदाहरण देणे, यामुळे शिरूरमध्ये राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Dilip Walse Patil-Dilip Mohite-Shivajirao Adhalrao Patil
Mangalveda News : काका-पुतण्याच्या मनोमिलनासाठी आवताडे समर्थकांकडून मनधरणी : भालके-परिचारक युतीचे कडवे आव्हान

शेवटच्या क्षणी कोल्हेंनी भाजपत प्रवेश केला आणि शिरूर भाजपला सुटला तर आढळराव पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय असू शकतो. तसंही आढळराव पाटील यांचा पहिला पक्ष हा राष्ट्रवादीच होता. पण दिलीप वळसे पाटील यांच्याशी बिनसल्याने त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता. आताही आणीबाणीच्या वेळी त्यांना घड्याळाशी जुळवून घेता येऊ शकते. तसंही महाविकास आघाडीमुळे त्यांचे आणि वळसे पाटील यांच्यातील संबंध सुधारले आहेत. ते वळसे पाटील यांच्यावर एका शब्दानेही टीका करत नाहीत.

Dilip Walse Patil-Dilip Mohite-Shivajirao Adhalrao Patil
Ashish Deshmukh News : काँग्रेसने नोटीस दिलेले आशिष देशमुख मुंबईहून थेट नागपूरला जाण्याऐवजी पुण्याला का गेले?

दरम्यान, शेलक्या शब्दांत एकमेकांचा समाचार घेणारे आढळराव आणि खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते हे एका लग्नाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. खरं तर ते दोघे एकमेकांशी बोलतील तरी का, अशी शंका उपस्थितींच्या मनात होती. मात्र, थोड उशिराने आलेले आढळराव थेट दिलीप मोहिते यांच्या बाजूला जाऊन बसले. त्यानंतर त्यांच्या सख्या मित्रांप्रमाणे संवाद आणि हास्यविनोद सुरू होता, तो बघून इतर राजकीय नेते आणि कार्यकर्ते अचंबित झाले नसले तर नवलच! त्यामुळे आढळराव यांनी जुनी दुश्मनी संपवून लोकसभा निवडणुकीसाठी पेरणी सुरू केली तर नाही ना, अशी चर्चाही कार्यक्रमस्थळी होती.

Dilip Walse Patil-Dilip Mohite-Shivajirao Adhalrao Patil
Karnataka Assembly Election : ‘शिवकुमारांनी माझी राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त केली’: दुसरी यादी जाहीर होताच काँग्रेसमध्ये उफाळली बंडखोरी

आढळराव यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत सलगी वाढताना दिसत आहे आणि ती सहाजिकही आहे. एकतर भाजपच्या नेतेमंडळींकडून शिरूरमध्ये केंद्रीय मंत्री पाठवले जात आहे. तसेच, चंद्रकांतदादांसारखे वरिष्ठ नेतेही याच मतदारसंघाबाबत बोलत आहेत. त्यामुळे राजकारणात सर्व पर्याय खुले ठेवावे लागतात, त्या न्यायाने उद्या शिरूर भाजपला सुटला आणि कोल्हेंना उमेदवारी दिली तर आढळराव राष्ट्रवादीकडून लढल्यास नवल वाटू नये.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com