Shivajirao Adhalarao Patil : लोकसभा पुन्हा लढण्याचा निर्धार; पण आढळरावांना असणार दुहेरी टेन्शन!

Shivajirao Adhalarao Patil News : मला नवीन बळ आल आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला जनतेच्या पाठिंब्यावर मी मैदानात असेल आढळराव पाटील म्हणाले.
Shivajirao Adhalarao Patil News
Shivajirao Adhalarao Patil NewsSarkarnama

Shivajirao Adhalarao Patil News : 'शिरूर लोकसभा मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर मी थांबलो नाही, किंवा घरात बसलो नाही. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. गेल्या सहा महिन्यापासून तुम्हाला सगळे माहिती आहे. मला नवीन बळ आल आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला जनतेच्या पाठिंब्यावर मी मैदानात असेल, असे संकेत बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) पक्षाचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी दिले. मात्र, पुढील लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना आढळराव यांच्यासमोर अडचणीही असणार आहेत.

भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) हे शिरुरमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेच्या माध्यमातून भाजपचा वातावरण निर्मीती करण्याचा प्रयत्न आहे. शिरुरची जागा ही शिवसेनेची आहे. आता ती जागा भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या युतीमध्ये शिंदे गटाकडे जायला हवी. मात्र भाजप येथे वातावरण निर्मीती करत असल्याने आढळराव पाटील यांचे टेन्शन वाढले असल्याचे बोलले जात आहे.

Shivajirao Adhalarao Patil News
Shivajirao Adhalarao Patil News : गेल्या सहा महिन्यांपासून बळ आले; २०२४ ला पुन्हा दंड थोपटणारच : आढळराव पाटील

तसेच भोसरीचे आमदार व भाजप नेते महेश लांडगेही लोकसभा निवडणुकीसाठी शिरुरमधून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यातच नड्डा यांची सभा होणार असल्याने आढळरावांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. भाजपने देशात 'मिशन १४४'च्या तयारीला महाराष्ट्रातून सुरवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवरच नड्डा यांच्या जाहीर सभा होत आहेत.

मात्र, भाजपच्या 'मिशन १४४'चा फटका आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. कारण भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी आत्तापासून सुरु केली आहे. भाजपने जर या मतदार संघावर दावा सांगितला त्यांचा उमेदवार कोण असणार अशा प्रश्न आहे. त्यात महेश लांडगेही भाजपचे उमेदवार असू शकतात किंवा विद्यमान खासदारही भाजपकडून लढू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अशा परिस्थितीत आढळराव काय करणार असा प्रश्नच आहे. त्यांच्यासमोर भाजपकडून लढण्याचा पर्याय असू शकतो, पण भाजपचा उमेदवार कोण असणार यावर सगळे गणित अवलंबून आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. २०१९ मध्ये आढळराव पाटलांचा पराभव झाला असला तरी त्यांना २०२४ ला संधी मिळू शकते, असे बोलले जात होते. मात्र, आता शिवसेनेत फूट पडल्याने दोन गटात ताकद विभागली केली आहे. त्यामुळे आढळरावांना पहिला सामना शिवसेनेशीच करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांची वाट बिकट दिसत आहे.

भाजप तिकिट वाटप करताना मतदार संघातील सर्वेचा अंदाज घेईल. त्यामध्ये आढळरावांचे पारडे जड ठकरले तरच त्यांच्या उमेदवारीचा विचार होऊ शकतो. मात्र, ते शिंदे गटात गेल्याने त्यांच्या पराभवासाठी शिवसैनिक रात्रीचा दिवस करतील असे शिवसेनेच्या वर्तुळातून बोलले जात आहे. त्याचा फटका त्यांना बसू शकतो. अशा वेळी भाजप दुसऱ्या उमेदवाराला तिकिट देऊ शकतो. भाजपने शिंदे गटातील विद्यमान खासदारांच्या मतदार संघात सभा आणि मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यामुळे शिंदे गटात जाऊनही आढळरावांची खासदारकी फिक्स नसल्याचेच दिसत आहे.

Shivajirao Adhalarao Patil News
Ajit Pawar News : 'माझ्याकडून बोलण्याच्या ओघात चूक झाली' अजितदादांनी मागितली 'त्या' विधानावर माफी

दरम्यान, लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता.७) रात्री राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त झालेल्या कवी संमेलनात बोलताना आढळराव पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. मात्र, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीला जनतेच्या पाठिंब्यावर मी मैदानात असेल, असे सांगितले. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

जे. पी. नड्डा हे २० जानेवारीला पुणे (Pune) दौऱ्यावर येणार असून ते पुण्यातील शिरुर मतदारसंघात सभा घेणार आहेत. याबाबची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली होती. त्यामुळे या सभेत नड्डा नेमकी काय बोलतात? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in