राऊतांच्या मनात काय? फडणवीसांचे कौतुक, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहांना भेटणार

Sanjay Raut News : संजय राऊत यांच्या भूमिकेची राजकीय वर्तुळात चर्चा
Sanjay Raut, Devendra Fadnavis, Narendra Modi
Sanjay Raut, Devendra Fadnavis, Narendra ModiSarkarnama

Sanjay Raut News : पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (ShivSena) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बुधवारी न्यायालयाने जामिन मंजूर केला. संजय राऊत तब्बल १०० दिवस तुरुंगात होते. मात्र, तुरुंगातून सुटका झाल्यानंतर राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधतांना देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. राऊत यांच्या मनात नेमके काय आहे, असा सवाल विचारला जात आहे. राऊत यांनी फडणवीसांचे कौतुक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटे घेतले. मागील काही दिवासांपासून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुद्धा फडणवीस यांच्या विषयी नरमाईची भूमिका घेतली आहे.

Sanjay Raut, Devendra Fadnavis, Narendra Modi
Devendra Fadanvis : संजय राऊतांनी मागणी केली तर भेट देणार ; कटुता एक पक्ष संपवू शकत नाही!

त्यामुळे शिवसेना भाजपच्या नेत्यांचे कौतुक करुन नेमकी काय रणनिती आखते आहे, याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. संजय राऊत यांनी तुरुंगातून सुटल्यानंतर तर आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे. फडणवीसांचे कौतुक करत शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. राऊत म्हणाले, कोर्टाने जी ऑर्डर माझ्या जामिनाबाबत दिली त्यामुळे देशात एक चांगला मेसेज गेला. ज्यांनी हा कट रचला होता त्यांना आनंद झाला असेल. माझ्या मनात कुणाविषयीही तक्रार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या कुटुंबाने अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. मात्र, राजकारणात अशा गोष्टी घडतात. अशा प्रकारचे राजकारण कधीही देशाने पाहिले नाही. असेही राऊत यांनी म्हटले आहे. राजकीय शत्रू असतील तरीही चांगले वागण्याची परंपरा आपल्याकडे आहे. ठीक आहे जे झाले ते झाले. राज्यात नवे सरकार आले आहे. त्यांनी काही निर्णय चांगले घेतले. विरोधासाठी मी विरोध करणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय चांगले घेतले. गरीबांसाठी घरांसाठीचा निर्णय असेल किंवा म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय असेल, असे राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut, Devendra Fadnavis, Narendra Modi
गुलाबराव पाटील, सत्तारांना भाजपच्या संगतीने वाण नाही पण गुण लागला...

राज्याचे देवेंद्र फडणवीस यांची भेट मी घेणार आहे. राज्याचा कारभार हे उपमुख्यमंत्री चालवत आहेत, असे म्हणत राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले. जे माझे काम आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या विभागाशी संबंधित आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन माझ्या सोबत काय घडले हे सांगणार आहे. पंतप्रधान हे देशाचे असतात पक्षाचे नसतात, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in