शिवसेना-भाजपमध्ये रंगणार आणखी एक सामना; पण, महाराष्ट्राबाहेर

शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
शिवसेना-भाजपमध्ये रंगणार आणखी एक सामना; पण, महाराष्ट्राबाहेर
ShivSena, BJPsarkarnama

सिल्वासा : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये नियमीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतांना दिसत आहेत. आता शिवसेना (ShivSena) आणि भाजप यांच्यामध्ये आणखी एक सामना रंगणार आहे. परंतु तो सामना महाराष्ट्राबाहेर, दादरा नगर हवेलीमध्ये पाह्यला मिळणार आहे.

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणुक होत आहे. त्यासाठी शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या दोन दिवसांच्या सिल्वासा दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणीही त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजप पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. सिल्वासामध्ये शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही सभा होण्याची शक्यता संजय राऊत यांनी वर्तवली आहे. ही निवडणूक शिवसेनेने चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे.

 ShivSena, BJP
फडणवीसांच्या मोहिमेला अशोक चव्हाणांकडून धक्का; खतगावकरांची मनधरणी अयशस्वी

संजय राऊत म्हणाले, पोटनिवडणूक फार महत्त्वाची आहे. कलाबेन डेलकर यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मोहन डेलकर यांनी ९ वेळा निवडणूक लढवली. त्यामध्ये ते सातवेळा विजयी झाले आहेत. डेलकर यांचे वडील मोठे स्वातंत्र सैनिक होते. डेलकर यांच्या कुटुंबाला इथल्या झुंड शाही आणि गुंडांपासून सवरक्षण पाहिजे होते, त्यामुळेच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दादरा नगर हवेलीत प्रशासक ठरवतो कोणी कोणत्या राजकीय पक्षाचे काम करायचे. ही एक नवीन प्रथा पायंडा सुरू झाली आहे, असेही राऊत म्हणाले.

 ShivSena, BJP
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

दरम्यान, त्यांनी महाराष्ट्रतील भाजपच्या नेत्यांवरही टिकेचे बाण सोडले, काल मी पाहिले महाराष्ट्र भाजपचे एक नेते राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांचा उल्लेख अरे-तुरे, एकेरी भाषेत करीत होते. राज्याची ही परंपरा नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांच्याविषयी कधी असे बोलत नाही. अटलजी आमचे श्रद्धास्थान राहिले होते आहेत. आडवाणी यांना आजही आम्ही मानतो. आपल्यापेक्षा वय, अनुभव आणि विचारांनी मोठे असलेल्यांचा आदर करावा. विचारांची लढाई विचारांनी करावी हे आम्हाला महाराष्ट्राने शिकवले…काल राजकारणात आलेली लोक पवारांचा उल्लेख एकेरी करता म्हणून मी म्हणतो यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणे गरजेचे आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in