बाळासाहेबांना जे जमले नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवले...

महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची ती एकमेव सभा होती.
Kala ben Delkar,  Uddhav Thackeray
Kala ben Delkar, Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : दादरा नगर-हवेली (Dadra Nagar Haveli) लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सभा घेतली होती. शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनीही १९९९ मध्ये दादरा नगर हवेलीत शिवसेना उमेदवारासाठी सभा घेतली होती. पण त्यावेळी यश मिळाले नव्हते. आदित्य यांनी दादरा नगर हवेलीत सभा घेत डेलकरांच्या विजयाला मोठा हातभार लावला. बाळासाहेबांचे दादरा नगर हवेली जिंकण्याचे स्वप्न त्यांचा नातू आदित्य यांनी २२ वर्षांनंतर पूर्ण करुन दाखवले.

Kala ben Delkar,  Uddhav Thackeray
अजितदादांनी आडकाठी आणली तर माझ्याकडे या; आपण पवारसाहेबांकडे जाऊ!

बाळासाहेब ठाकरे यांची १९९९ मध्ये प्रचारसभा झाली होती. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार उत्तम पटेल यांच्या प्रचारासाठी त्यांनी सिल्वासामध्ये सभा घेतली होती. मात्र, त्यावेळी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यानंतरही शिवसेनेने अनेक निवडणुका दादरा नगर हवेलीमध्ये लढल्या. त्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्राबाहेर झालेली बाळासाहेबांची ती एकमेव सभा होती. यात त्यांनी मोहन डेलकर यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेचा दाखला भाजपने आताच्या पोटनिवडणुकीतही दिला होता. मात्र त्याच फायदा झाला नाही. डेलकर यांच्या निधनाच्या सहानुभूतीचा फायदा कलाबेन यांना झाला. शिवसेनेने योग्य संधी ओळखत भाजपच्या पराभवात वाटा उचलला.

Kala ben Delkar,  Uddhav Thackeray
शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मिळाला पहिला खासदार; कलाबेन डेलकर विजयी

बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर मोठ्या कालावधीनंतर त्यांचे नातू आदित्य ठाकरे हे सिल्वासामध्ये कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी गेले होते. आज डेलकर यांच्या पत्नीच्या रुपाने शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार मिळाला आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. अपक्ष खासदार राहिलेल्या डेलकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाने शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यानंतर कलाबेन डेलकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. मोहन डेलकर यांनी 9 वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते 7 वेळा निवडून आले होते. कलाबेन डेलकर या तब्बल ५१ हजार मंतानी विजयी झाल्या. ही निवडणूक शिवसेना आणि भाजपनेही प्रतिष्ठेची केली होती. भाजपने आपली केंद्रीय प्रचार यंत्रणा निवडणूक रिंगणात उतरवली होती. अनेक केंद्रीय मंत्री अ्न खासदार आमदार भाजपच्या विजयासाठी मतदार संघात तळ ठोकून बसले होते.

त्या विरोधात शिवसेनेने आदित्य ठाकरे यांची सभा तसेच खासदार संजय राऊत, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रचारात उतरले होते. डेलकर यांच्या प्रचार यंत्रणेला सोबत घेत शिवसेनेने योग्य नियोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पहिला धक्का दिला आहे. संजय राऊत यांच्या मताप्रमाणे शिवसेना २०१४ च्या निवडणुकीत केंद्रात महत्त्वाच्या भूमिकेत असेल आणि त्याची सुरुवात ही दादरा नगर हेवेलीतून होईल. त्या प्रमाणे पहिला विजय तर शिवसेनाला मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com