sp.jpeg
sp.jpeg

शरद पवारांनी सीबीआयला करून दिली 'या' चैाकशीची आठवण...

दाभोळकर यांच्याहत्येच्या तपास 2014पासून सीबीआय करीत आहे. पण या तपासात अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही, या तपासाची आठवण शरद पवार यांनी सीबीआयला करून दिली आहे.

पुणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडं सोपविलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॅा. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणाच्या चैाकशीची सीबीआयला आठवण करून दिली आहे.  

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयद्वारे सुरू असलेल्या चौकशीप्रमाणे सुशांत प्रकरणाची परिणती होऊ नये, असे शरद पवार यांनी सांगितले. याबाबत शरद पवार यांनी टि्वट केलं आहे. 

आपल्या टि्वटमध्ये शरद पवार यांनी म्हटलं आहे की मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही. 

सुशांतच्या तपासाबाबत पवार टि्वटमध्ये म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास #CBI च्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.

डॅा. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपास 2014पासून सीबीआय करीत आहे. पण या तपासात अद्याप फारशी प्रगती झालेली दिसत नाही, या तपासाची आठवण शरद पवार यांनी निमित्ताने सीबीआयला करून दिली आहे. 

सात वर्षापूर्वी आजच्या दिवशीच डॅा. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली होती. या प्रकरणाची अद्याप चैाकशी पूर्ण झाली नसल्याची खंत दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर आणि त्यांचे चिंरजीव डॅा. हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं काल दिला आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे.

या प्रकरणाचं सर्व पुरावे महाराष्ट्र सरकारने सीबीआयला द्यावे, आदेशाचं पालनं करावं, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारनं दाखल केलेला गुन्हा योग्यच असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. बिहार सरकारला तपासाला अधिकार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे. या तपासाबाबत आज सीबीआयची बैठक आहे. 
Edited  by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com