शरद पवारांनी अमित शहांकडे केल्या दोन महत्वाच्या मागण्या...

अमित शहा यांच्या भेटीवेळी शरद पवार यांच्यासोबत खासदार सुनिल तटकरे, जयप्रकाश दांडेगांवकर व प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते.
Sharad Pawar and Amit Shah meeting on issues faced by the sugar sector
Sharad Pawar and Amit Shah meeting on issues faced by the sugar sector

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीमध्ये पवारांनी दोन महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. केंद्र सरकारने सहकार खात्याची निर्मिती केल्यानंतर शहा यांच्याकडे या खात्याची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच शहा यांची भेट घेतली आहे. (Sharad Pawar and Amit Shah meeting on issues faced by the sugar sector)

अमित शहा यांच्या भेटीवेळी शरद पवार यांच्यासोबत खासदार सुनिल तटकरे व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर व प्रकाश नाईकनवरे उपस्थित होते. या बैठकीत संघाच्या वतीने शहा यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांबाबत शरद पवार यांनी ट्विटर हे निवेदन प्रसिध्द करत या भेटीही माहिती दिली आहे. 

साखर क्षेत्रातील सध्याची देशातील स्थिती आणि जादा साखर उत्पादनामुळं निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा झाल्याचे पवार यांनी म्हटलं आहे. साखरेचे किमान विक्री मुल्य (MSP) आणि साखर कारखान्यांमध्ये इलेनॉल निर्मिती प्रकल्पांची उभारणी करणे, हे दोन महत्वाचे मुद्दे शहा यांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही पवारांनी म्हटले आहे. त्यांच्याकडून या मुद्यांचा विचार करून लवकर मार्ग काढला जाईल, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवार आणि अमित शहा यांची स्वतंत्र भेट झाली. पंतप्रधान मोदी व शरद पवार यांची 17 जुलै रोजी भेट झाली होती. ही भेट सरकारी बँका व कोरोनाशी संबंधित मुद्यांवर झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. पण या भेटीने राज्यात खळबळ उडवून दिली होती. महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांकडूनच स्बवळाची भाषा सुरू झाल्यानंतर ही भेट झाल्याने चर्चांना उधाण आले होते. आता पंधरा दिवसांतच शरद पवार यांनी अमित शहांची भेट घेतली आहे. 

दोघांमधील पंधरा मिनिटांच्या बैठकीनंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप या भेटीबाबत अधिकृतपणे कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असून तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचे काही उदाहरणे समोर आली होती. त्यावरून भाजपने सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. सरकारकडून मात्र तिन्ही पक्षांचं सरकार स्थिर असून पाच वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com