"शंभूराज देसाई - उदयसिंह पाटील' साडूंच्या पदरी अपयश! 

शंभूराज देसाई आणि ऍड. उदयसिंह पाटील हे "साडू' आहेत. शंभूराज देसाई हे पाटण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. ऍड. उदयसिंह पाटील हे कऱ्हाड तालुक्‍यातील स्थानिक आघाडीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. साताऱ्यातील बडे राजकीय प्रस्थ असलेले, माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे ते पुत्र आहेत. ऍड. पाटील हे कऱ्हाड विधानसभेतील संभाव्य दावेदार असल्याने त्यांच्या पराभवाला मोठा राजकीय अर्थ आहे.
 "शंभूराज देसाई - उदयसिंह पाटील' साडूंच्या पदरी अपयश! 
"शंभूराज देसाई - उदयसिंह पाटील' साडूंच्या पदरी अपयश! 

सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपच्या मदतीने नियोजन समितीत 30 जागा जिंकत वर्चस्व सिद्ध केले. भाजपला चार तर कॉंग्रेसने पाच जागा जिंकत सर्वांना धक्का दिला. आमदार शंभूराज देसाई व खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीची युती होऊनही देसाईंना सर्वसाधारणमधील एक जागा साविआच्या मताअभावी गमवावी लागली. उदयसिंह पाटील यांना मतांची बेरीज जुळली नाही. तर सर्वांचे लक्ष लागलेल्या लढतीत जिजामाला निंबाळकरांनी विजय मिळविला. 

जिल्हा नियोजन समितीच्या 40 जागांपैकी यापूर्वीच अकरा जागा बिनविरोध झाल्या होत्या. यामध्ये राष्ट्रवादीच्या आठ, भाजपची एक तर कॉंग्रेसच्या दोन जागांचा समावेश होता. मंगळवारी उर्वरित 29 जागांसाठी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीने 22, भाजपने तीन, कॉंग्रेसने तीन तर उदयनराजे भोसले यांच्या साविआला एक जागा जिंकता आली. त्यामुळे नियोजन समितीत आता राष्ट्रवादीच्या 30, कॉंग्रेसच्या पाच, भाजपच्या चार तर सातारा विकास आघाडीचा एक सदस्य असेल. 

सकाळी 10 वाजता मोजणी सुरु झाली. सर्व प्रथम नगरपंचायतीची मोजणी झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या शोभा माळी (मते72) नऊ मतांनी विजयी झाल्या. विरोधातील रेश्‍मा कोकरे (कॉंग्रेस) यांना 63 मते मिळाली. शोभा माळी यांनी राष्ट्रवादीची विजयी माळ लावली आणि त्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातून राष्ट्रवादीचे संजय पिसाळ 20 मतांनी निवडून आले. त्यांना 78 मते तर कॉंग्रेसचे मनोहर शिंदे यांना 58 मते मिळाली. 

त्यानंतर नगर पालिकेची मतमोजणी झाली. यात अनुसूचित जाती प्रवर्गातून राष्ट्रवादीचे (नविआ) बाळू खंदारे सर्वाधिक 124 मतांनी विजयी झाले. त्यांना 156 मते तर विरोधातील भाजपचे मिलिंद काकडे यांना 32 मते मिळाली. नागरीकांच्या मागास प्रवर्ग स्त्री राखीवमधून लिना गोरे (राष्ट्रवादी, नविआ) यांना 103 तर विरोधातील (शिवसेना) शारदा ढाणक यांना 85 मते मिळाली. सौ. गोरे 18 मतांनी विजयी झाल्या. नागरीकांच्या मागासप्रवर्गातून राष्ट्रवादीचे आनंद कोरे यांना 119 तर कॉंग्रेसचे विजय वाटेगांवकर यांना 69 मते मिळाली. कोरे 50 मतांनी निवडून आले. 

पालिका मतदारसंघातील स्त्री राखीवमधून राष्ट्रवादीच्या पल्लवी पवार यांना 108 तर साविआच्या स्नेहा नलवडे यांना 78 मते मिळाली. पल्लवी पवार 30 मतांनी विजयी झाल्या. येथे दोन मते अवैध ठरली. पालिकेच्या सर्वसाधारण प्रवर्गातून राष्ट्रवादीचे चरण गायकवाड यांना 117 तर कॉंग्रेसचे अशोक जाधव यांना 67 मते, तर राष्ट्रवादीतील पण शेखर गोरे यांचे धनाजी माने यांना दोन मते मिळाली. पालिकेच्या पाचही जागा जिंकत राष्ट्रवादीने आघाडी घेतली. 

जिल्हा परिषद मतदारसंघाच्या मोजणीत सुरवातीला अनुसूचित जाती स्त्री राखीवची मतमोजणी झाली. येथे 22 चा कोटा होता. येथे भाजपच्या रेश्‍मा शिंदे यांना 37, वनिता पलंगे यांना 22 मते मिळाल्याने त्या विजयी झाल्या. पण तिसऱ्या उमेदवार मधू कांबळे यांना चार मते मिळाली. त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार असूनही त्यांच्या कोट्यातील 18 मते रेश्‍मा शिंदेंकडे वळवली. त्यामुळे सौ कांबळे पराभूत झाल्या. अनुसुचित जाती प्रवर्गात 22 मतांचा कोटा होता. यात राष्ट्रवादीचे शेखर गोरेंचे उमेदवार बापू जाधव यांना 42, तर भाजपचे सागर शिवदास यांना 21 मते मिळाली. त्यामुळे बापू जाधव विजयी झाले. येथे पाच मते बाद झाली. 

जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्वसाधारण प्रवर्गात मतांचा कोटा सात होता. तर नऊ जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात होते. पहिल्या फेरीत सात मते मिळाल्याने मंगेश धुमाळ, मानसिंगराव जगदाळे, उदय कबुले (राष्ट्रवादी) तर मनोज घोरपडे (भाजप) विजयी झाले. दुसऱ्या फेरीत सहा मते मिळालेले रमेश पाटील, बाबासाहेब पवार, शिवाजी चव्हाण (राष्ट्रवादी) आणि जिजामाला निंबाळकर (कॉंग्रेस) या विजयी झाल्या. तर तिसऱ्या फेरीत निवास थोरात हे पाच मते मिळाल्याने विजयी झाले. कोट्यापेक्षा कमी मते मिळाल्याने शंभूराज देसाई आघाडीचे विजय पवार (चार), उदयसिंह पाटील (तीन) (कविआ) हे पराभूत झाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com