नवखा आमदार मुख्यमंत्री झाल्याने ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात अन् अमित शहा 'अॅक्शन मोड'वर - senior bjp leaders upset over pushkar singh dhami appointment as cm | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

नवखा आमदार मुख्यमंत्री झाल्याने ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात अन् अमित शहा 'अॅक्शन मोड'वर

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

उत्तराखंडमध्ये तिरथसिंह रावत यांच्या जागी मुख्यमंत्रिपदी पुष्करसिंह धामी यांची निवड झाली आहे. 

डेहराडून : उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) तिरथसिंह रावत (Tiath Singh Rawat) यांच्या जागी  मुख्यमंत्रिपदी पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांची निवड झाली आहे. पक्षांतर्गत मतभेदामुळे उत्तराखंडला चार महिन्यांत तिसरा मुख्यमंत्री मिळाला असला तरी नवख्या आमदाराला मुख्यमंत्री केल्याने भाजपमधील (BJP) ज्येष्ठ नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या नाराज नेत्यांशी चर्चा करण्यास सुरवात केली आहे. 

उत्तराखंडमधील मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी भाजपने  केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि भाजपचे प्रभारी दुष्यंतकुमार गौतम यांना पाठवले होते. प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला हजर राहण्याचा पक्षादेश सर्व आमदारांना बजावण्यात आला होता. या बैठकीत पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रिपदासाठी करण्यात आली.  सत्पाल महाराज, यशपाल आर्य, बिशनसिंह चौफाल, सुबोध उनियाल आणि हरकसिंह रावत हे ज्येष्ठ नेते आता धामी यांच्या निवडीमुळे नाराज झाले असल्याचे समजते. यातील बहुतांश नेते 2016 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. त्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली होती. 

राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक मंत्री नाराजी व्यक्त करीत आहेत. सत्पाल महाराज यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांची बैठक झाली. यातून निवडणुकीच्या तोंडावर हे नेते भाजपला मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराज नेत्यांशी संपर्क केला आहे. ते नाराज नेत्यांची समजूत काढत आहेत. शिक्षणंत्री धनसिंह रावत यांच्यावर यशपाल आर्य यांची समजूत काढण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. नैनितालचे खासदार अजय भट्ट यांना चौफाल यांची समजूत काढण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, धामी यांनी स्वत: सत्पाल महाराज यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. 

हेही वाचा : आमदार प्रताप सरनाईक थेट विधिमंडळात अवतरले अन् म्हणाले...

धामी हे 45 वर्षांचे असून, त्यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली आहे. ते उत्तराखंडचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरणार आहेत. धामी हे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या जवळचे मानले जातात. धामी हे सलग दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु, त्यांना मंत्रिपदाचा कोणताही अनुभव आहे. राज्यात भाजपमधील गटबाजीमुळे चार महिन्यांत तिसरा मुख्यमंत्री आला आहे.धामी यांची निवड पक्ष नेतृत्वाने केली असली तरी यातून पक्षातील ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत. त्यांनी उघडपणे बंडाची तयारी सुरू केली आहे. यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांना शांत करण्यासाठी बैठकांचा धडाका लावला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख