हा तर रावणापेक्षाही अत्याचारी... मुंडेंच्या दुसऱ्या पत्नीचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
second wife karuna sharma files complaint against social welfare minister dhananjay munde
second wife karuna sharma files complaint against social welfare minister dhananjay munde

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरुद्धची बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी नुकतीच मागे घेतली होती. त्यामुळे मुंडे यांच्यावरील राजकीय आणि कायदेशीर संकट टळले असे वाटत असताना ते पुन्हा अडचणीत आले आहेत. रेणू शर्मांची मोठी बहीण व मुंडेंची दुसरी पत्नी करुणा शर्माने आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. मागील तीन महिन्यांपासून मुडेंनी मुलांना डांबून ठेवल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 

करुणा शर्मा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे आज तक्रार दिली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, मागील तीन महिन्यांपासून मुंडेंनी त्यांच्या दोन्ही मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवलं आहे. ते मला त्यांना भेटू देत नाहीत. मी 24 जानेवारीला मुलांना भेटण्यासाठी गेले होते.  त्यावेळी 30 ते 40 पोलीस बोलावून मुंडेंनी मला हुसकावून लावलं. 

बंगल्यावर माझी मुलं सुरक्षित नाहीत. माझ्या मुलांना भेटू न दिल्यास मी 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहे. चित्रकूट बंगला, मंत्रालय अथवा आझाद मैदानावर मला उपोषणाला परवानगी द्यावी आणि मुंडेंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करुणा यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.   खरे तर या दोघांमधील वाद सामंजस्याने सोडविण्याचे उच्च न्यायालयात ठरले होते. तरीही करुणा शर्मा यांनी पुन्हा जाहीर तक्रार केल्याने त्याविषयी वाद पुन्हा सुरू झाला आहे. 

रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधात केलेली तक्रार मागे घेतली होती. याबद्दल त्यांनी ट्विट करुन यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली होती. एका मोठ्या राजकीय षडयंत्राची मी शिकार होत असल्याची जाणीव मला झाली होती. काही लोक माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय यांना लक्ष्य करत होते आणि हे चुकीचे असल्याचे मला समजत होते, यामुळे हा निर्णय घेतल्याचे रेणू शर्मांनी म्हटले होते.  

मुंडे यांच्यावरील आरोपानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. भाजपसह इतर विरोधी पक्षांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. मात्र, भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मांवरच आरोप केले होते. यामुळे विरोधकांच्या मागणीतील हवाच निघून गेली होती. याचबरोबर राष्ट्रवादीही मुंडे यांच्यामागे भक्कमपणे उभी राहिली होती. मुंडेवर आरोप केल्यानंतर रेणू शर्मा याच काही दिवसांना लक्ष्य होऊ लागल्याचे उलट चित्र दिसत होते. यामुळे त्यांनी माघार घेण्यामागे हेच कारण असल्याची चर्चा होती. 

रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपामुळे मोठे वादळ उठले होते. धनंजय मुंडे यांनाही आपले दुसरे लग्न झाले असून दोन मुले असल्याचे जाहीरपणे सांगावे लागले होते. मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. मात्र त्यातून ते सहीसलामत सुटल्याचे दिसून येत आहे. दोन मुलांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपविल्याबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली होती. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com