कोरोनाची तिसरी लाट येणार अन् ती तब्बल 98 दिवस चालणार! एसबीआयचा अंदाज

आता कोरोनाची तिसरी लाट येणार असून, ती दुसऱ्या लाटेप्रमाणेच तीव्र असेल, असा अंदाज एसबीआयने वर्तवला आहे.
sbi says third wave of covid will be as severe as second wave
sbi says third wave of covid will be as severe as second wave

नवी दिल्ली : देशात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट (Second Wave) आली असून, एकूण रुग्णसंख्या 3 कोटींच्या जवळ पोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशात 3.35 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. या लाटेत देशातील आरोग्य व्यवस्थाच कोलमडून पडली. आता कोरोनाची तिसरी लाट (Third Wave) येणार असून, ती दुसऱ्या लाटेप्रमाणेच तीव्र असेल, असा अंदाज एसबीआयने वर्तवला आहे. तिसरी लाट 98 दिवसांपर्यंत चालेल, अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

एसबीआयच्या इकोरॅप अहवालात तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अहवालात म्हटले आहे की, तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेप्रमाणेच तीव्र असेल. परंतु, आधीच तयारी आणि सज्जता करुन मृत्यूचे प्रमाण कमी करता येऊ शकते. जगातील आघाडीच्या देशांमध्ये तिसऱ्या लाटेचा कालावधी 98 दिवस असेल. दुसऱ्या लाटेचा कालावधी 108 दिवस आहे. दुसऱ्या लाटेत देशात एकाच दिवसात विक्रमी 4.14 लाख नवीन कोरोना रुग्ण सापडले होते. 

मे महिन्यात भारतात 90.3 लाख रुग्ण सापडले आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त रुग्ण भारताने नोंदवले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे महिन्याच्या मध्यापासून कोरोना रुग्णसंख्या कमी होण्यास सुरवात झाली. असे असले तरी एप्रिलमधील 69.4 लाख रुग्णसंख्येच्या तुलनेत मे महिन्यातील रुग्णसंख्या 30 टक्के जास्त होती. याचबरोबर मे महिन्यात देशात 1.2 लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले आहे.  

देशात दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 1.7 लाख मृत्यू झाले आहेत. सरकारने आधीच योग्य तयारी केली आणि खबरदारी घेतल्यास हे मृत्यू 40 हजारांपर्यंत खाली आणणे शक्य होईल. याचबरोबर गंभीर रुग्णांचे प्रमाणही 5 टक्क्यांवर आणता येईल. दुसऱ्या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण 20 टक्के होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवून सरकार तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करू शकते. सध्या देशातील केवळ 12.3 टक्के नागरिकांना कोरोना लशीचा एक डोस मिळाला आहे तर दोन्ही डोस मिळालेल्या नागरिकांची संख्या केवळ 3.27 टक्के आहे. जुलैच्या मध्य ते ऑगस्टच्या सुरवातीला दररोज 1 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com