Satyajeet Tambe : भाजपाकडून ‘ऑपरेशन लोटस्’च्या जागी ‘ऑपरेशन वॉशआऊट’: सत्यजीत तांबे ही त्याची सुरवात

Satyajeet Tambe News : सत्यजीत तांबेंच्या रूपाने सुरू झालेली कॉंग्रेसची गळती
Satyajeet Tambe News : Devendra Fadnavis : Eknath shinde
Satyajeet Tambe News : Devendra Fadnavis : Eknath shindeSarkarnama

Satyajeet Tambe News : नाशिक पदवीधर मतदारसंघातून कॉंग्रेसने दिलेली उमेदवारी डॉ. सुधीर तांबे व सत्यजीत तांबे पितापुत्रांनी टाळली. या माध्यमातून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारे राजकारण गुरूवारी घडले. सत्यजीत तांबे यांनी थेट अपक्ष अर्ज भरला.आता पदवीधरची निवडणूक होईलही किंवा तांबे बिनविरोध निवडून येतील. मात्र, कॉंग्रेसचे राजकीय खच्चीकरण एवढ्यावरच थांबणार नाही. सत्यजीत तांबेंच्या रूपाने सुरू झालेली कॉंग्रेसची गळती यापुढच्या वर्ष-दीड वर्षाच्या काळात आणखी घडवून आणण्यात येणार असून त्यास ‘ऑपरेशन वॉशआऊट’ या नावाने मूर्त रूप दिले जाणार आहे.

राज्यात भाजप-एकनाथ शिंदे गटाचे सरकार आहे. लोकसभा निवडणुकीला सुमारे सव्वा वर्ष तर विधानसभा निवडणुकीला सुमारे पावणेदोन वर्षे बाकी आहेत. राजकीय तज्ञांच्या मते लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्यामुळे येत्या वर्षभराच्या काळात कॉंग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना गळाला लावण्याची योजना भाजपाकडून आखण्यात आली आहे. त्यास ‘ऑपरेशन लोटस’ ऐवजी ‘ऑपरेशन वॉशआऊट’ असं संबोधण्यात येत आहे. यासाठी राज्यातील कॉंग्रेसच्या सुमारे वीस ते बावीस आमदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. येत्या काळात महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातून या आमदारांना आपल्या बाजूला वळविण्याची योजना आहे.

Satyajeet Tambe News : Devendra Fadnavis : Eknath shinde
Satyajeet Tambe : बघा काय आली वेळ; मोदींच्या फोटोला काळे फासणाऱ्या तांबेच्या विजयासाठी आता भाजप झटणार !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसच्या विविध भागातील आमदारांशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करण्यात आला आहे. येत्या निवडणुकांमध्ये प्रत्येकाला त्या-त्या आमदाराच्या स्थानिक गरजेप्रमाणे मदत करण्यात येणार आहे. यातील बहुतेजण आमदारकीची मुदत संपेपर्यंत कॉंग्रेसमध्ये राहून काम करणार आहेत. अगदी गरज पडली तरच ते उघडपणे भाजपाच्या बाजूने येणार आहेत. नाशिक पदवीधरमध्ये ज्याप्रमाणे नियोजन करून कॉंग्रेसला टाळत अपक्ष अर्ज भरण्यात आला.सर्व करून भाजपा नामानिराळी राहिली. अगदी त्याप्रमाणे इतर ठिकाणीदेखील स्थानिक गरजेप्रमाणे भाजपाकडून योजना आखण्यात येणार आहेत.

Satyajeet Tambe News : Devendra Fadnavis : Eknath shinde
Satyajeet Tambe News; तांबेचा डाव हा तर प्री प्लॅन मिशन लोटस!

गेल्या काही महिन्यांपासून कॉंग्रेसचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. यातील काहीजण एकनाथ शिंदे यांच्याही संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.आमदारांनी कितीही नाकारले तरी अनेकजण संपर्क ठेऊन असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. येत्या काळात महाराष्ट्राला हादरा बसेल, असा स्फोट होणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरूवारी सांगितले आहे. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केल्यामुळे बावनकुळे आणखी कोणता मोठा राजकीय स्फोट करणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात लागून राहिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in