संजय राऊत म्हणाले, भाजप अन् शिवसेनेचं नातं आमीर खान-किरण राव सारखं! - Sanjay Raut says BJP ShivSena like Amir Khan and Kiran Rao | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

संजय राऊत म्हणाले, भाजप अन् शिवसेनेचं नातं आमीर खान-किरण राव सारखं!

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जुलै 2021

आमीर खान आणि किरण राव यांनी मागील नुकताच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शिवसेना आपला शत्रु नसल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच भाजप व शिवसेनेच्या युतीबाबत बोलताना फडणवीस यांनी परिस्थिती येते त्यानुसार निर्णय होत असतात, असे म्हणाले होते. यावर बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दोन्ही पक्षांचा संबंध थेट अभिनेता आमीर खान व त्यांची पत्नी किरण राव यांच्याशी जोडला. (Sanjay Raut says BJP ShivSena like Amir Khan and Kiran Rao)

आमीर खान आणि किरण राव यांनी मागील नुकताच घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण घटस्फोटांतरही त्यांची मैत्री तसेच मुलाचा सांभाळ एकत्रितपणे करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यापार्श्वभूमीवर राऊत यांनी फडणवीस यांच्या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. 

हेही वाचा : ओबीसी आरक्षण : भुजबळ व फडणवीस यांची जुगलबंदी

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, 'आम्ही भारत-पाकिस्तान नाही. आमीर खान आणि किरण राव यांच्याकडे पहा, आम्ही त्यांच्यासारखे आहोत. शिवसेना व भाजपचे राजकीय मार्ग वेगळे आहेत. पण आमची मैत्री कायम आहे.'

शिवसेना व भाजपच्या युतीवर बोलताना फडणवीस म्हणाले होते की, आमच्यात कधीच शत्रुत्व नव्हतंच. आम्ही शत्रु नाही. आमच्यात वैचारीक मतभेद झाले कारण आमचे मित्र आमचा हात सोडून ज्यांच्या विरोधात निवडून आले त्यांचाच हात पकडून निघून गेले. त्याच्यामुळे मतभेद उभे झाले. राजकारणामध्ये जर तर अर्थ नसतो. जी परिस्थिती येते त्यानुसार निर्णय होत असतात. जर तर वर जे राजकारणी राहतात ते स्वप्नच पाहत राहतात, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

राऊत व शेलार यांच्या भेटीविषयी माहिती नसल्याचे सांगत फडणवीस म्हणाले, कोणाच्या भेटीगाठी झाल्या याबाबत मला माहिती नाही. अधिकृतपणे कोणाचीही भेटगाठ नाही किंवा चर्चा नाही. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन विरोधी पक्ष म्हणून जनतेसाठी लढाई लढण्याची आमची तयारी आहे. 

बारा आमदार निलंबित

विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान गोंधळ घातल्याच्या कारणास्तव सोमवारी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर भाजपच्या सदस्यांनी वॅाकआऊट केलं. या आमदारांमध्ये आशिष शेलार, अतुल भातखळकर, राम सातपुते, गिरीश महाजन आदींचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख