संजय राऊत म्हणतात, दया..कुछ तो गडबड जरूर है!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने टाकलेल्या छाप्यांचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
sanjay raut questions cbi raids on former home minister anil deshmukh
sanjay raut questions cbi raids on former home minister anil deshmukh

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) छापे टाकले असून, या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनेही या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या कारवाईबाबत शंका उपस्थित केली आहे. 

संजय राऊत यांनी देशमुखांवरील कारवाईबाबत शंका उपस्थित करताना लोकप्रिय सीआयडी मालिकेतील संवादाचा वापर केला आहे. राऊत यांनी म्हटले आहे की, कुछ तो गडबड है. उच्च न्यायालयाने फक्त प्राथमिक चौकशीचे आदेश देत अहवाल सादर करा, असे सीबीआयला सांगितले होते. अनिल देशमुखांवर धाडी, एफ.आय. आर.वगैरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नाही. दया..कुछ तो गडबड जरूर है.
 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसनेही या कारवाईचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. 

अँटिलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो, असे पाटील यांनी म्हटले आहे. 

अनिल देशमुख यांचा बचाव करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सीबीआय कारवाईच्या विरोधात आक्रमकपणे उत्तर देण्याचे पक्षाने ठरविले आहे. त्यानुसार पाटील यांनी या कारवाईचा निषेध करत हे बदनामीचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादीचे इतर नेतेही या कारवाईच्या विरोधात आवाज उठवत आहेत. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनीही या कारवाईच्या विरोधात आवाज उठवला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com