Jalgaon District Bank : संजय पवारांना उमेदवारी द्या, असे काँग्रेस-राष्ट्रवादीचे संचालक खडसेंना चार दिवसांपासून सांगत होते : गुलाबरावांचा गौप्यस्फोट

आम्ही कोणतीही खेळी केलेली नाही.
Gulabrao Patil-Sanjay Pawar-mangesh chavan
Gulabrao Patil-Sanjay Pawar-mangesh chavanSarkarnama

जळगाव : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक गेल्या चार दिवसांपासून संजय पवार यांना उमेदवारी द्यावी, असे एकनाथ खडसे यांना सांगत होते. पण, त्यांनी रवींद्र पाटलांना उमेदवारी दिली, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नाराजांनी पवारांना मतदान केलं. आम्ही कोणतीही खेळी केलेली नाही. आमच्याकडे तर फक्त सातच मतं आहेत, त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतील लोकांनीच पवार यांना निवडून आणले आहे, असा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केला. (Sanjay Pawar was elected on Congress-NCP's vote: Gulabrao Patil)

जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर संजय पवार निवडून आले, तर अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा एका मताने पराभव झाला. त्या विजयानंतर गुलाबराव पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सगळ्यांच्या मतानुसार जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद आमच्याकडे आले आहे. इथं कोणावरही प्रेशर टाकण्यात आलेला नाही. लोकांच्या मनात होतं की जिल्हा बॅंकेत बदल केला पाहिजे. पण, बॅंक चालवण्यासाठी आम्ही यापुढेही एकनाथ खडसे यांचे आशीर्वाद घेणार आहोत. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सहकार क्षेत्रात राजकारण नको, या भूमिकेचा मीही आहे

Gulabrao Patil-Sanjay Pawar-mangesh chavan
Jalgaon District Bank : शिवसेना, काँग्रेसने आमचा विश्वासघात केला : जळगाव जिल्हा बॅंकेतील पराभवानंतर खडसेंचा आरोप

राष्ट्रवादीतील बंडावर गुलाबराव पाटील म्हणाले की, कुणीतरी विकासाचा अदृश्य आत्मा आला आणि त्यांनी संजय पवारांना मतदान केलं. आम्ही उपाध्यपदासाठी एकच अर्ज भरणार होतो. पण राष्ट्रवादीतूनच दुसरा फॉर्म भरला गेला आणि राष्ट्रवादीतील नाराज लोकांनी मतदान केल्यामुळेच पवार हे निवडून आले.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मतावरच संजय पवार विजयी झाले आहेत. आम्ही नाथाभाऊंना धक्का दिलेला नाही. निवडणुकीत जय-पराजय होत असतात. पण, बॅंक चालविण्यासाठी आम्ही त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि जिल्ह्याचा विकास करू. आम्ही कोणतीही खेळी केलेली नाही. आमचं म्हणणं होतं की बॅंकेच्या निवडणुकीवेळी भाजपला सोबत घ्या, गिरीश महाजन दोनवेळा बैठकीला आले होते. पण काही लोकांनी ते जमू दिलं नाही. पण भगवान के घरमें देर है लेकीन अंधेर नही, असेही पाटील यांनी नमूद केले.

Gulabrao Patil-Sanjay Pawar-mangesh chavan
Jalgaon District Bank Election : नगरनंतर जळगावातही राष्ट्रवादीला धक्का : जिल्हा बॅंक निवडणुकीत अधिकृत उमेदवाराचा पराभव

सत्ता ही दादागिरी करण्यासाठी नसते. सत्ता ही जनतेसाठी आहे. तुम्ही आजपर्यंत ती स्वतःची प्रॉपर्टी म्हणून राबवली. आम्ही जनतेसाठी राबवत आहोत. इतर लोकांना सत्तेवर बसण्याचा हक्क नाही का. सगळ्यांना सत्तेचा बसण्याचा हक्क असतो. आज जो निर्णय घेतला आहे, तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलेला आहे. आम्ही फक्त बघितलं की काय चाललंय ते. आमचा काहीच दोष नाही, या निवडणुकीत, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

संजय पवार हे शिंदे गटात आहेत की राष्ट्रवादीत यापेक्षा हे शेतकऱ्यांच्या हिताच्या गटात आहेत. सचिवांना गेल्या पाच वर्षांपासून पगार मिळालेले नाही. चिमणराव पाटील यांचे चिरंजीव अमोल पाटील योगायोगाने जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष झाले आहेत. त्यांनी सचिवांचा प्रश्न सोडवावा, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी दिला.

Gulabrao Patil-Sanjay Pawar-mangesh chavan
Jalgaon District Bank : खडसेंना धक्का; जळगाव जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी बंडखोर संजय पवार विजयी

आमच्याकडे अकरा मतं कोठून येणार

आम्ही एकनाथ खडसे यांच्याच सहकार्याने राजकारणात आलो, त्यांच्या आशीर्वादामुळे मोठे झालो. पण त्यांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे की, वेळ कुठे चालली आहे. रवींद्र पाटील हे कधीच निवडून आले नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक गेल्या चार दिवसांपासून संजय पवार यांना उमेदवारी द्यावी, असे सांगत होते. पण खडसेंनी रवींद्र पाटलांना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अदृश्य आत्म्यांनी संजय पवार यांना मतदान केलं. आमच्याकडे अकरा मत नाही, आमच्याकडे फक्त सहा मतं आहेत. संजय सावकारे धरले सात होतात. मग आमच्याकडे अकरा मते कोठून येणार. त्यांची मदत पवार यांना निवडून येण्यात झाली, असा दावा पाटील यांनी केला.

स्वकेंद्रीत राजकारणाला चपराक : मंगेश चव्हाण

स्वकेंद्रीत राजकारण करणाऱ्यांना ही चपराक आहे. एकनाथ खडसे यांना विधान परिषदेतील गटनेतेपद राष्ट्रवादीनं दिलं. पण, स्वतःच्या पक्षातील चार डोकीसुद्धा ते व्यवस्थित सांभाळू शकत नाहीत, हे त्यांचं दुर्दैवं म्हणावं लागेल. या निवडणुकीत संचालकांमधील नाराजीचा स्फोट झाला आहे, असे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com