राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांच्या फिल्डिंगची जबाबदारी धोत्रेंवर

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांच्या फिल्डिंगची जबाबदारी धोत्रेंवर

अकोला : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्यासाठी मतांची फिल्डींग लावण्याची महत्वपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रातून भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार संजय धोत्रे यांच्यावर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोपविली आहे. खासदार धोत्रे सध्या रामनाथ कोविंद यांच्यासोबत झारखंड येथे मतदानाचे आवाहन करण्यासाठी गेले आहेत. 

खासदार संजय धोत्रे यांच्या कर्तुत्वाची व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या कलेची भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने दखल घेऊन मागच्या आठवड्यातच त्यांची संसदीय कामकाज समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करून भाजपा कार्यकर्त्यांना सुखद धक्का दिला होता.

त्यानंतर आता होऊ घातलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार रामनाथ कोविद यांचे सोबत प्रचारासाठी झारखंड येथे लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी पाठवुन त्यांच्या कर्तुत्वाचा गौरव केला आहे. या दौऱ्यात कोविंद यांच्यासोबत महाराष्ट्रातुन खासदार संजय धोत्रे, भोपाळचे खासदार अलोककुमार संजर असुन त्यांनी झारखंड राज्यातील खासदार, आमदारांची भेट घेऊन राष्ट्रपती पदासाठी मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com