काँग्रेसमध्ये जुंपली; सलमान खुर्शीद अन् गुलाम नबी आझाद आमनेसामने

आता काँग्रेसमध्येच जुंपली असून, सलमान खुर्शीद आणि गुलाम नबी आझाद समोरासमोर आले आहेत.
Salman Khurshid and Ghulam Nabi Azad
Salman Khurshid and Ghulam Nabi AzadSarkarnama

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाच्या निकालावर भाष्य करणाऱ्या काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या नव्या पुस्तकावरून वाद उफाळला आहे. त्यांनी हिंदुत्वाची (Hindutva) तुलना इसिस (ISIS) व बोको हराम (Boko Haram) यासारख्या दहशतवादी संघटनांशी केली आहे. यावरुन आता काँग्रेसमध्येच जुंपली असून, खुर्शीद आणि गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) समोरासमोर आले आहेत.

‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या खुर्शीद यांच्या पुस्तकावरून हा वाद सुरू झाला आहे. पुस्तकाच्या प्रकाशनावेळी काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम व दिग्विजयसिंह यांनी केलेली वक्तव्येही वाद ओढवून घेणारी ठरली आहेत. या पुस्तकाच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. असे असताना काँग्रेसमधूनही पुस्तकाला विरोध होऊ लागला आहे. पुस्तकावरून आझाद यांनी खुर्शीद यांनी टोला लगावला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजकीय विचारसरणी म्हणून आपण हिंदुत्वाशी सहमत नाही. परंतु, हिंदुत्वाची तुलना इसिस आणि जिहादी इस्लामसोबत करणे तथ्यदृष्ट्या चुकीचे आहे. याचबरोबर ते अतिशयोक्ती करीत आहेत.

याला खुर्शीद यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, आझाद यांनी म्हटले आहे की, ते हिंदुत्वाच्या विचारसरणीशी सहमत नाहीत. मी आपण त्याच्याशी का सहमत नाही, हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मी कोणतीही अतिशयोक्ती केलेली नाही. कारण अतिशयोक्ती, मूल्यमापन आणि दृष्टिकोन हा व्यक्तीनुसार बदलत असतो. त्यांना वाटणारी अतिशयोक्ती मला वाटणार नाही. मला त्यांच्याशी वाद घालायचा नाही. त्यांनी सहजपणे टिप्पणी केली असावी. त्यांच्या मतांचा मी आदर करतो पण मी माझे मत बदलणार नाही.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उफाळलेल्या या वादाची भविष्यातही पुनरावृत्ती होण्याचा अंदाज राजकीय जाणकार वर्तवत आहेत. भाजपने राममंदिराचा मुद्दा या निवडणुकीच्या आधी तापवण्यास सुरवात केली आहे. हा वाद भाजप-काँग्रेस यांच्यातल्या श्रेयवादाच्या लढाईची साखळी आहे, असेही जाणकार मानत आहेत. खुर्शीद यांनी पुस्तक प्रकाशनासाठी निवडलेल्या मुहूर्तावरही भाजप नेते प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.

Salman Khurshid and Ghulam Nabi Azad
गेहलोत भेटून गेले अन् 24 तासांतच पायलट यांना सोनिया गांधींनी भेटीसाठी बोलावलं

खुर्शीद यांनी म्हटले आहे की, त्यांनी हिंदू धर्माबद्दल आदरच व्यक्त केला आहे. मात्र हिंदुत्वाची अलीकडे प्रचलित केलेली राजकीय व्याख्या आक्षेपार्ह व घातक असून, हे नवे हिंदुत्व इसिस व बोको हराम या दहशतवादी संघटनांच्या कार्यशैलीशी साधर्म्य दाखवते. तब्बल 100 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तटस्थ विश्लेषण वाचायचे तर लोकांनी हे पुस्तक वाचावे.

Salman Khurshid and Ghulam Nabi Azad
आपल्याच पक्षातील सलमान खुर्शीद यांना आझादांनी पाडलं उघडं

वादास कारण ठरली एक ओळ

खुर्शीद यांच्या पुस्तकातील 1500 व्या पानावरील अक्षरशः एका ओळीवरून हा वाद उफाळला आहे. ती ओळ अशी - भारतातील साधू-संत शतकांपासून जो सनातन धर्म व मूळ हिंदुत्वाची चर्चा करत आहेत त्याला आज कट्टर हिंदुत्वाआडून बाजूला सारले जात आहे. आज हिंदुत्वाची अशी राजकीय आवृत्ती काढली जात आहे जी इसिस व बोको हराम या इस्लामी जिहादी संघटनांशी साधर्म्य सांगते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com