...म्हणून किरीट सोमय्या गल्लीत गोंधळ घालत आहेत!

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे.
Sachin Sawant criticizes BJP and Kirit Somaiya
Sachin Sawant criticizes BJP and Kirit Somaiya

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हात प्रवेश करण्यास बंदी करण्यात आली आहे. दुपारी त्यांना याबाबतची नोटीस देण्यात आली. तत्पूर्वी त्यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावर सोमय्या यांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी सोमय्या यांच्या जोरदार टीका केली आहे. (Sachin Sawant criticizes BJP and Kirit Somaiya)

सावंत यांनी ट्विट करत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या दुसऱ्यांच्या मालमत्ता तिसऱ्याच्या म्हणून दाखवतात. कोणाच्याही जागेकडे बोट दाखवून बेनामी म्हणतात म्हणून जनतेत भीती आहे. याचकरिता बंदी घातली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या असतानाही त्यांचे काम भाजपा करणार का? सोमय्यांनी नौटंकी कायद्याच्या चौकटीत करावी, असा टोला सावंत यांनी लगावला आहे. 

सोमय्यांना दिल्लीतील भाजपा नेते मुजरा करायला देत नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा, असं सावंत म्हणाले. 

फडणवीस सरकारच्या काळात केवळ कडकनाथ कोंबड्या दाखवल्या म्हणून तडीपार करणारे, सभेत काळे कपडे घालण्यास मनाई करणारे व आंदोलना आधीच स्थानबद्ध करणारे भाजपा नेते सोमय्यांना नोटीस दिली म्हणून गळे काढत आहेत. बाबांनो, सोमय्या कोणाच्याही मालमत्ता बेनामी म्हणून दाखवतात म्हणून जनतेत घबराट आहे, असं सावंत यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. 

दुसऱ्याच्या मालमत्ता तिसऱ्याची म्हणून सांगितल्यावर लोक बोंब मारणार की नाही? सोमय्यांच्या नौटंकीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून जिल्हा बंदी आहे. सोमय्या तक्रारी करत आहेत ना!. नाहीतरी राष्ट्रीय तपास यंत्रणा भाजपाच्या शाखा झाल्या आहेत मग त्यांचे काम भाजपाच करणार का, असा सवालही सावंत यांनी केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com