काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; कारण ठरले अमित शहा...

काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केलं आहे.
काँग्रेसमध्ये पुन्हा वादाची ठिणगी; कारण ठरले अमित शहा...
Amit Shah

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्यांमधील वाद संपण्याचे नाव घेत नाहीत. पंजाबमध्ये (Punjab Congress) पुन्हा एका राजकारण तापलं आहे. नेत्यांमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. पण यावेळी गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) कारणीभूत ठरले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने एक महत्वाचा आदेश काढला आहे. या आदेशानुसार पश्चिम बंगालसह पंजाब, आसाम या राज्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (Border Security Force) अधिकार क्षेत्र वाढविण्यात आले आहे. यावरून काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनाच लक्ष्य केलं आहे.

बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये आता सीमेपासून आतमध्ये 50 किलोमीटरपर्यंत अधिकार बहाल कऱण्यात आले आहेत. यामध्ये पंजाबचाही समावेश आहे. यापूर्वी पंजाबमध्ये केवळ 15 किलोमीटरपर्यंत बीएसएफला अधिकार होते. आता हे क्षेत्र 35 किलोमीटरने वाढल्याने त्याला काँग्रेसने विरोध केला आहे. पण त्यावरून काँग्रेसमधील वादही उघड झाले आहेत.

Amit Shah
अमित शहांचा मोठा निर्णय; गुजरातला दिलासा देत पंजाब, बंगालला दणका

काँग्रेस विरूध्द काँग्रेस अशीच स्थिती निर्माण झाली आहे. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल जाखड (Sunil Jakhad) यांनी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, तुम्ही तुमच्या मागणीबाबत सावधान रहा. चरणजीत चन्नी यांना नकळतपणे पंजाबचा अर्धा हिस्सा केंद्र सरकार सोपवण्यात यश तर मिळाले नाही ना? 25 हजार चौरस किलोमीटर (एकूण 50 हजार चौरस किमी) वर आता बीएसएफचे अधिकार क्षेत्र असेल. आपल्याला अजूनही राज्यांना अधिक स्वायत्तता हवी आहे का, असे सवाल जाखड यांनी उपस्थित केले आहेत.

मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधील वाद पुढे आले आहेत. त्यातच आता हा निर्णय आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चन्नी यांनी काही दिवसांपूर्वीच शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यानंतर आठवडाभरातच हा निर्णय झाल्याने जाखड यांनी चन्नी यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

कशावरून सुरू झाला वाद?

गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांत सीमा सुरक्षा, जम्मू व काश्मीर आदी मुद्यांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बीएसएफचे अधिकार क्षेत्र वाढवण्याचा निर्णयही महत्वाचा मानला जात आहे. बीएसएफला आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये आता सीमेपासून आतमध्ये 50 किलोमीटरपर्यंत अधिकार बहाल कऱण्यात आले आहेत. या भागात तपास करणे, संशयितांना अटक करणे, जप्ती करणे असे अधिकार मिळाले आहे.

पंजाब, पश्चिम बंगाल व आसाममध्ये पूर्वी बीएसएफचे अधिकारक्षेत्र केवळ 15 किलोमीटरहोते. आता सुधारित आदेशानुसार हे क्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रात बीएसएफला तपासणी करायची असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही.

Related Stories

No stories found.