राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नवे सरकार्यवाह...भैय्याजी जोशी यांच्या जागी कोण?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक येत्या 19 व 20 मार्चला बंगळूरमध्ये होत आहे.
RSS akhil bhartiya prathinidhi sabha meet will be held in bengaluru
RSS akhil bhartiya prathinidhi sabha meet will be held in bengaluru

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक येत्या 19 व 20 मार्चला बंगळूरमध्ये होत आहे. कोरोनाचा कहर सुरू असल्याने या बैठकीतील निमंत्रितांची संख्याही तुलनेने कमी असणार आहे. मागील दशकभर सरकार्यवाह ही संघातील महत्वाची जबाबदारी भैय्याजी जोशी यांच्याकडे आहे. यंदाच्या बैठकीत जोशी यांच्याऐवजी नवीन सरकार्यवाह नियुक्त होणार अशी चर्चा आहे. यामुळे या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.  

या बैठकीत देशातील सद्य:स्थितीवर संघाचे मत व भविष्यातील रोडमॅप ठरविण्यात येतो. त्यामुळे ही बैठक राजकीय वर्तुळातही महत्वाची असते. कोरोनामुळे संघाने मागील वर्षी होणारी अशीच बैठक रद्द केली होती. संघाच्या देश पातळीवरील प्रतिनिधी सभेत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह संघ परिवाराच्या विविध संघटनांचे प्रमुख सहभागी होतात. बैठकीत सरसंघचालकांचे भाषण होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे संघाच्या अशा बैठकांत सुमारे 3 हजार प्रतिनिधी सहभागी होतात. यंदा कोरोनामुळे ही बैठक छोटी असेल आणि त 500 ते 550 वरिष्ठ स्वयंसेवक नेते सहभागी होतील. यावर्षी प्रत्येक प्रांतातील निवडक 7 ते 8 संघनेत्यांनाच निमंत्रित करण्यात आले आहे. यंदाच्या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह भैय्याजी जोशी, दत्तात्रय होसबळे, मनमोहन वैद्य, कृष्णगोपाल आदी संघनेते सहभागी होतील.

संघात सरकार्यवाह हे दुसऱ्या क्रमांकाचे पद असते. मागील दशकभर संघातील ही महत्वाची जबाबदारी भैय्याजी जोशी यांच्याकडे आहे. यंदाच्या बैठकीत जोशी यांच्याऐवजी नवीन सरकार्यवाह नियुक्त होणार अशी चर्चा सुरू आहे. याआधी तीन वर्षांपूर्वीही अशीच चर्चा सुरू होती. त्यावेळी भैय्याजी यांच्या प्रकृती अस्वाथ्याबाबत चर्चा होती. मात्र, तेव्हा या पदावर त्यांचीच निवड झाली होती. संघाच्या इतिहासात या पदासाठी निवडणूक झालेली नाही. उपस्थित प्रतिनिधी सभा सदस्यांकडून नव्या सरकार्यवाहपदासाठी नावे मागविण्यात येतात  आणि निवड केली जाते. 

यंदाच्या प्रतिनिधी सभेसमोरील ठळक विषय
- कोरोना संकटाचा संघाचे कार्य, शाखा आणि त्यातील उपस्थितीवर झालेला परिणाम 
- कोरोना संकटाच्या काळातील संघाचे समाजोपयोगी कार्य
- आयुर्वेद, पारंपारिक काढ्यांचा उपयोग आणि त्यामुळे कोरोनातही भारतीयांच्या जीवनशैलीवर फार मोठा अनिष्ट परिणाम नाही.
- कोरोनामुळे भारतीयांच्या जीवनशैलीवर झालेला परिणाम व बदल 
- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरात अनेक उपक्रम राबविण्याच्या योजनेला अंतिम रूप देणे
- अयोध्येतील राममंदिराच्या निर्मितीचा आढावा

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com