बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश-लालू पर्व? लालूंनी केलं मोठं विधान...

राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे माझ्या हृदयात आहेत, असे विधान केले आहे.
rjd supremo lalu prasad yadav says nitish kumar is in his heart
rjd supremo lalu prasad yadav says nitish kumar is in his heart

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी बिहारचे (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) हे माझ्या हृदयात आहेत, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरुन अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पेगॅसस प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखाली चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली आहे. यावरून नितीशकुमार यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळत पेगॅसिस प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर लालूंचे विधान महत्वाचे मानले जात आहे. 

नाती ही बनत आणि बिघडत असतात. आम्ही तर आधी एकत्र राहिलो आहोत. नितीशकुमार माझ्या हृदयात आहेत,  असे लालूंनी म्हटले आहे. लालू यांनी जुने सहकारी माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांची आज दिल्लीत भेट घेतली. या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय जनता दल आणि संयुक्त जनता दल (JDU) भविष्यात एकत्र येणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे मात्र टाळले. जेडीयू हा केंद्रात आणि बिहारमध्ये भाजपचा सहकारी पक्ष आहे. 

लालूंचे पुत्र व बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी 30 जुलैला नितीशकुमार यांची भेट घेतली होती.  देशात जातिनिहाय जनगणना करावी, या मागणीसाठी आपल्या शिष्टमंडळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट द्यावी, अशी मागणी त्यांनी नितीशकुमारांकडे केली होती. नितीश यांनी ही मागणी केवळ मान्यच केली नसून, त्यांच्या जेडीयूच्या राष्ट्रीय अधिवेशनात जातिनिहाय जनगणनेला पाठिंबा देणारा आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्याविरोधात ठराव केला आहे. 

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रत्येक पक्षाकडून काँग्रेससह विरोधकांवर टीका केली जात आहे. पण बिहारमध्ये भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनलेले नितीश कुमार यांनी भाजपलाच अडचणीत आणलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी. अनेक दिवसांपासून फोन टॅपिंगबाबत आपण ऐकत आहोत. संसदेत त्यावर चर्चा व्हायला हवी. विरोधक चर्चेचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे चर्चा करायलाच हवी. 

नितीश कुमार यांच्या या भूमिकेमुळे भाजपसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. आता एनडीएतील मित्रपक्षही चौकशी मागणी करू लागल्याने विरोधकांना बळ मिळाले आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. संसदेत कोणत्याही मुद्यावर चर्चा होत नसल्यानं कामकाज ठप्प झालं आहे. सरकारकडून विरोधकांवर टीका केली जात असून चर्चेचं आवाहन केलं जात आहे. पण विरोधक आपल्या मागणीवर ठाम आहेत. ही कोंडी फोडण्यासाठी राहुल गांधी सरसावले असून त्यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com